• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अहिल्यानगरमध्ये ‘फसल विमा महिना’ला सुरुवात; मृग बहार फळपीक विम्यासाठी १४ जुलै अंतिम मुदत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
17
VIEWS
Ad 1
Ad 1

अहिल्यानगर | प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्यात १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत भारतीय कृषी विमा कंपनी (AIC) तर्फे ‘फसल विमा महिना’ साजरा करण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ अहिल्यानगर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी तंत्र अधिकारी दत्तात्रय जाधव आणि कृषी सहाय्यक यांच्या हस्ते करण्यात आला.

RelatedPosts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

यावेळी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना (मृग बहार–२०२६) मध्ये सहभागी होण्यासाठी १४ जुलै २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

कृषी विभाग तसेच भारतीय कृषी विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी गणेश सानप यांनी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

या योजनेअंतर्गत डाळिंब, संत्रा, मोसंबी, सीताफळ, लिंबू, पेरू, चिकू आदी फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच हळद या पिकाचाही योजनेत समावेश करण्यात आला असून संबंधित शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची संधी ठरणार आहे.

‘फसल विमा महिना’ निमित्त भारतीय कृषी विमा कंपनीचे प्रतिनिधी गावोगावी भेटी देत ‘फसल विमा पाठशाळा’ आयोजित करत आहेत. या माध्यमातून योजनेची पात्रता, नोंदणी प्रक्रिया, विमा संरक्षणाचे फायदे आणि नैसर्गिक आपत्तीपासून आर्थिक संरक्षण याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे.

हवामानातील सततच्या बदलामुळे फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वाढत असल्याने विमा योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आर्थिक सुरक्षा कवच ठरत असल्याचे गणेश सानप यांनी सांगितले.

त्यांनी शेतकऱ्यांना शेवटच्या दिवसाची वाट न पाहता १४ जुलैपूर्वीच अर्ज करून फळपीक विमा संरक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Ad 1
Previous Post

गेवराई पोलिसांची जुगार अड्ड्यावर धडक कारवाई; सहा जण ताब्यात, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

माळशेज घाटात दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक; सुदैवाने जीवितहानी टळली

Related Posts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!
Blog

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
7
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी
Blog

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
7
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..
Blog

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026
3
औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?
Blog

औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?

October 11, 2026
49
शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड
Blog

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

October 11, 2026
38
दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा
Blog

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

October 11, 2026
3
Next Post

माळशेज घाटात दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक; सुदैवाने जीवितहानी टळली

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In