• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माजी नगरसेवक सय्यद एजाज यांच्या पाठपुराव्याला यश; तय्यब नगरला एसटी बसचा अधिकृत थांबा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

गेवराई | प्रतिनिधी

RelatedPosts

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

गेवराई शहरातील झपाट्याने विकसित होत असलेल्या तय्यब नगर आणि शिक्षक कॉलनी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. माजी नगरसेवक सय्यद एजाज यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या परिसरासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) विनंती बस थांबा मंजूर झाला आहे.

बुधवारी (दि. ८ जुलै) या नव्या बसथांब्याच्या नामफलकाचे उद्घाटन तालुक्याचे लोकनेते बाळराजे पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यापूर्वी या परिसरातील नागरिकांना एसटी बस पकडण्यासाठी मोंढा नाका येथे जावे लागत असल्याने वेळ, पैसा आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांच्या या अडचणीची दखल घेत माजी नगरसेवक सय्यद एजाज यांनी एसटी डेपो व्यवस्थापक तसेच बीड येथील नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून हा बसथांबा मंजूर करून घेतला.

उद्घाटनप्रसंगी बाळराजे पवार यांनी बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी बसथांब्याजवळ लहान स्वरूपाचे प्रवासी निवारा शेड उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुभाष सुतार, अय्युब बागवान, भाजप नेते बाळासाहेब सानप, नगरसेवक अकीफ काझी, बाबूभाई, माजिद मोईन तसेच परिसरातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तय्यब नगर व शिक्षक कॉलनी परिसरातील नागरिकांनी बीड–जालना महामार्गावर एसटी बसथांबा सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीला अखेर यश मिळाल्याने आता विविध मार्गांवरील एसटी बसेस या ठिकाणी थांबणार असून प्रवाशांना चढ-उताराची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत माजी नगरसेवक सय्यद एजाज तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

Previous Post

आवास–सासवणे–दिघोडी एसटी सेवा तीन महिन्यांपासून बंद; प्रवाशांचे हाल, बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी

Next Post

गेवराई पोलिसांची जुगार अड्ड्यावर धडक कारवाई; सहा जण ताब्यात, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥
Blog

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026
3
Blog

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
5
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी
Blog

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026
71
सप्ताहाची सांगता; सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार
Blog

सप्ताहाची सांगता; सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार

August 25, 2026
12
“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”
Blog

“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”

August 25, 2026
51
सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या
Blog

सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या

August 25, 2026
3
Next Post

गेवराई पोलिसांची जुगार अड्ड्यावर धडक कारवाई; सहा जण ताब्यात, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In