• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उद्धवसेनेचे ठिय्या आंदोलन; निकृष्ट सोयाबीन बियाणे कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 11, 2026
in Blog
0
0
SHARES
63
VIEWS
Ad 1
Ad 1

तेल्हारा | प्रतिनिधी

तेल्हारा तालुक्यात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. संबंधित बियाणे कंपनीवर गुन्हा दाखल करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुक्यातील दहिगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. मात्र, निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे अनेक शेतांमध्ये सोयाबीनचे उगवणच झाली नसल्याने शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून संबंधित कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी उद्धवसेनेचे कार्यकर्ते किरण अवताडे यांनी केली.

गुरुवार (दि. ९ जुलै) रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान यंदा मान्सून उशिरा सक्रिय झाल्याने पेरणी जवळपास महिनाभर उशिराने झाली. त्यातच पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

कृषी विभागाकडे तेल्हारा तालुक्यातून आतापर्यंत सुमारे ६५ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यामध्ये दहिगाव परिसरातील तक्रारींची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती देण्यात आली. पावसाअभावी आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाणे खरेदी केले होते. मात्र, बियाण्यांची उगवण न झाल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

संबंधित बियाणे उत्पादक कंपनीवर तातडीने गुन्हा दाखल करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी किरण पाटील अवताडे तसेच शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Ad 1
Previous Post

नाशिक रोड रेल्वे स्थानकावर मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना अवघ्या सहा तासांत अटक

Next Post

राजनखेड ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी विभागीय आयुक्तांना निवेदन; चौकशीची मागणी

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
3
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post

राजनखेड ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी विभागीय आयुक्तांना निवेदन; चौकशीची मागणी

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In