• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीगोंद्यात भरदिवसा तलवारीने जीवघेणा हल्ला; गंभीर जखमीला पुण्यात हलवले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in क्राईम
0
0
SHARES
199
VIEWS
Ad 1
Ad 1

श्रीगोंदा | प्रतिनिधी

RelatedPosts

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

श्रीगोंदा शहरात भरदिवसा एका व्यक्तीवर तलवारीने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. जखमी व्यक्तीचे आडनाव दांगडे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, हल्लेखोर व जखमी यांची संपूर्ण नावे अद्याप अधिकृतरीत्या समोर आलेली नाहीत.

ही घटना आज दुपारी ४ ते ४.३० वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा–मांडवगण रस्त्यावरील गणपती मळा परिसरात घडल्याची माहिती मिळाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, चार जणांनी मिळून तलवारीने हल्ला करून संबंधित व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी व्यक्ती मुलीला क्लासला सोडण्यासाठी श्रीगोंद्यात आली होती. मुलीला सोडल्यानंतर ती आपल्या घुगलवडगाव गावाकडे परत जात असताना गणपती मळा परिसरात चार जणांनी तिचा रस्ता अडवून तलवारीने हल्ला केला.

हल्ल्यानंतर जीव वाचवण्यासाठी संबंधित व्यक्ती रस्त्यालगतच्या एका घरात धावत शिरली. त्या घरात फक्त महिला उपस्थित होत्या. मात्र, हल्लेखोरांनी घरात घुसूनही तलवारीने हल्ला सुरूच ठेवला. या हल्ल्यात जखमीच्या डोक्याला, कपाळाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा समज झाल्याने हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

स्थानिक नागरिकांनी तत्काळ जखमीला श्रीगोंदा येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्याला पुणे येथे हलविले.

प्राथमिक माहितीनुसार, जखमी व्यक्ती आणि हल्लेखोर हे सर्व घुगलवडगाव येथील असून, त्यांच्यातील कौटुंबिक अथवा भावकीतील जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

भरदिवसा घरात घुसून झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे श्रीगोंदा परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असून, हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

Ad 1
Previous Post

पिंपरी चिंचवड ऑटोमोटिव्ह सर्विस सोसायटीतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य सहल

Next Post

गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व दप्तरांचे वाटप; पारिजात फाउंडेशन व भैरी भवानी प्रतिष्ठानचा प्रेरणादायी उपक्रम

Related Posts

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप
क्राईम

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

October 2, 2026
115
क्राईम

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

September 27, 2026
94
ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

August 14, 2026
19
“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”
क्राईम

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

August 14, 2026
11
राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा
क्राईम

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

August 13, 2026
109
क्राईम

सासऱ्याकडून जावयाची कुऱ्हाडीने हत्या; कौटुंबिक वादाचे रक्तरंजित पर्यवसान

July 16, 2026
11
Next Post

गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व दप्तरांचे वाटप; पारिजात फाउंडेशन व भैरी भवानी प्रतिष्ठानचा प्रेरणादायी उपक्रम

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In