• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 2, 2026
in क्राईम, ताज्या घडामोडी
0
बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

नांदखेड फाट्याजवळील घटना; चाकू व लोखंडी वस्तूने मारहाण करून १४ ते १५ हजार रुपये लुटल्याची तक्रार

पातूर : प्रतिनिधी— पातूर-अकोला मार्गावरील नांदखेड फाट्याजवळ अकोला येथील एका युवकाला चार ते पाच जणांनी अडवून चाकू व लोखंडी वस्तूने मारहाण करून त्याच्याकडील सुमारे १४ ते १५ हजार रुपये लुटल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सात ते आठ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे. यावेळी हल्लेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप संबंधित युवकाने पातूर पोलिसांकडे केला आहे.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

आयुब अली इरफान अली (रा. शिवणी, अकोला) हा मोटारसायकल क्रमांक एमएच ३० डीएच ५६५७ वरून पातूरकडून अकोल्याकडे जात होता. नांदखेड फाट्याजवळ चारचाकी वाहनातून आलेल्या चार ते पाच युवकांनी त्याला अडविले. त्यानंतर त्याला रस्त्याच्या कडेला नेऊन चाकू व लोखंडी वस्तूने मारहाण करण्यात आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मारहाणीनंतर त्याच्या खिशातील १४ ते १५ हजार रुपये काढून घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या घटनेत युवक जखमी झाला असून, त्याने तातडीने पातूर पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. संबंधित युवक इलेक्ट्रिशियनचे काम करत असून, कामानिमित्त पातूर येथे आला होता. येथून अकोल्याकडे परतत असताना नांदखेड फाट्याजवळ हा प्रकार घडल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

पातूरपासून काही किलोमीटर अंतरावर भररस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत पातूर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनेतील संशयितांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

दरम्यान, पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी व लुटमारीच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संशयितांचा तत्काळ शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Tags: pramod dongare
Previous Post

सावरगाव शिवारात सोयाबीनचे एकरी उत्पादन ७० किलोपर्यंत; शेतकरी संकटात

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12

ताज्या बातम्या

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

October 2, 2026
सावरगाव शिवारात सोयाबीनचे एकरी उत्पादन ७० किलोपर्यंत; शेतकरी संकटात

सावरगाव शिवारात सोयाबीनचे एकरी उत्पादन ७० किलोपर्यंत; शेतकरी संकटात

October 2, 2026
आत्माअंतर्गत वालखेडा येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न

आत्माअंतर्गत वालखेडा येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न

October 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In