• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

२ किलो गांजासह एकास अटक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 29, 2026
in क्राईम
0
२ किलो गांजासह एकास अटक
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

निलंगा पोलिसांची अन्सारवाडा शिवारात कारवाई; ६७ हजार २५ रुपयांचा गांजा जप्त

निलंगा (प्रतिनिधी) : अंमली पदार्थांविरोधात कारवाई करत निलंगा पोलिसांनी २ किलो १३५ ग्रॅम गांजासह एका व्यक्तीला अटक केली. चंद्रशेखर सुरेश पाटील असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत ६७ हजार २५ रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई २५ ऑक्टोबर २०२६ रोजी निलंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अन्सारवाडा शिवारात करण्यात आली.

RelatedPosts

गडचिरोलीत १२ हजारांची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता अटकेत

तळवडेतील ७३ तोळे सोन्याच्या लुटीचा आठ तासांत उलगडा; तिघांना अटक

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारवाडा शिवारात एक व्यक्ती गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची गोपनीय माहिती निलंगा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अभिषेक शिंदे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून आवश्यक मार्गदर्शन केले आणि कारवाईचे आदेश दिले.

त्यानुसार, पोलीस पथकाने अन्सारवाडा शिवारात सापळा रचला. यावेळी संशयित चंद्रशेखर सुरेश पाटील याला त्याच्या एमएच २५ एवाय ९०९६ क्रमांकाच्या मोटारसायकलच्या डिक्कीमध्ये गांजा बाळगलेल्या अवस्थेत पकडण्यात आले. त्याच्याकडून २ किलो १३५ ग्रॅम गांजा जप्त करून त्याला अटक करण्यात आली.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनाजी खापरे, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सोळंके, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रमेश म्हेत्रे, पोलीस हवालदार बालाजी विभुते, गोपाळ बर्डे, दयानंद वासुदेव, दादा शिंदे, महिला पोलीस हवालदार कल्पना साठे, तसेच पोलीस अंमलदार श्याम कुंभार, बाळकृष्ण मगर, भीमाशंकर भोसले, प्रदीप एरणवाड आणि प्रकाश चव्हाण यांनी सहभाग घेतला.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे करीत आहेत. या कारवाईबद्दल लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले.

अंमली पदार्थांची विक्री आणि अवैध वाहतूक रोखण्यासाठी निलंगा पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील अंमली पदार्थविरोधी मोहिमेला बळ मिळाले आहे.

Ad 1
Tags: Vilas Patil
Previous Post

जानकी महिला महाविद्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी

Next Post

सारोळा शिवारात शॉर्टसर्किटमुळे दहा एकर ऊस जळून खाक; शेतकरी हवालदिल

Related Posts

गडचिरोलीत १२ हजारांची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता अटकेत
क्राईम

गडचिरोलीत १२ हजारांची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता अटकेत

October 29, 2026
1
क्राईम

तळवडेतील ७३ तोळे सोन्याच्या लुटीचा आठ तासांत उलगडा; तिघांना अटक

October 18, 2026
8
बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप
क्राईम

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

October 2, 2026
115
क्राईम

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

September 27, 2026
94
ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

August 14, 2026
21
“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”
क्राईम

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

August 14, 2026
13
Next Post
सारोळा शिवारात शॉर्टसर्किटमुळे दहा एकर ऊस जळून खाक; शेतकरी हवालदिल

सारोळा शिवारात शॉर्टसर्किटमुळे दहा एकर ऊस जळून खाक; शेतकरी हवालदिल

ताज्या बातम्या

देऊळगावातील रिक्षाचालकाने जपली माणुसकी; कुत्री व तिच्या पिल्लांना दिला आश्रय!

देऊळगावातील रिक्षाचालकाने जपली माणुसकी; कुत्री व तिच्या पिल्लांना दिला आश्रय!

October 29, 2026
कोथळी येथे वर्षावासानिमित्त २७ व्या ग्रंथ पठण सोहळ्याची मंगलमय सांगता

कोथळी येथे वर्षावासानिमित्त २७ व्या ग्रंथ पठण सोहळ्याची मंगलमय सांगता

October 29, 2026
काझीपुरा येथे पशुवैद्यकीय शिबिरासह कडबा-कुट्टीवर युरिया प्रक्रिया प्रात्यक्षिक

काझीपुरा येथे पशुवैद्यकीय शिबिरासह कडबा-कुट्टीवर युरिया प्रक्रिया प्रात्यक्षिक

October 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In