• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दोंडाईच्यातील भांड्याच्या गोदामातील चोरीचा गुन्हा उघड; मुद्देमाल व हत्यारासह आरोपी अटकेत!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 7, 2026
in क्राईम
0
दोंडाईच्यातील भांड्याच्या गोदामातील चोरीचा गुन्हा उघड; मुद्देमाल व हत्यारासह आरोपी अटकेत!
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

दाऊळ रोड परिसरातून २७ हजारांचा चोरीचा माल जप्त; शरद भिल याला अटक, अन्य आरोपींचा शोध सुरू

दोंडाईचा : प्रतिनिधी

RelatedPosts

गडचिरोलीत १२ हजारांची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता अटकेत

२ किलो गांजासह एकास अटक

तळवडेतील ७३ तोळे सोन्याच्या लुटीचा आठ तासांत उलगडा; तिघांना अटक

दोंडाईचा शहरातील भांड्याच्या गोदामात झालेल्या चोरीचा गुन्हा दोंडाईचा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी एका आरोपीला सुमारे २७ हजार रुपये किमतीच्या चोरीच्या मुद्देमालासह आणि गुन्ह्यात वापरलेल्या लोखंडी हत्यारासह ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपासून ते २७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान दोंडाईचा शहरातील जुना शहादा रोड परिसरातील आयल कम्पाऊंड येथील भांडे व्यावसायिक युसुफ हातीमभाई कादीयानी यांच्या गोदामात चोरी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी गोदामाच्या मागील भिंतीला भगदाड पाडून स्टील, तांबे आणि पितळेची भांडी चोरून नेली होती.

याप्रकरणी फिर्यादी युसुफ हातीमभाई कादीयानी यांच्या तक्रारीवरून दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २१२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) प्रमाणे ४ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांनी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि शिरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना घटनेची माहिती दिली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक इमरान खान यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रविण निकुंभे, हिरालाल सूर्यवंशी, निलेश हालोरे, निलेश धनगर आणि होमगार्ड अमिन शाहा यांनी तपासात सहभाग घेतला.

परिसरातील गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यानुसार दोंडाईचा शहरालगत दाऊळ रोड परिसरात अमरावती नदीकाठी असलेल्या काटेरी झुडपांमध्ये संशयित शरद काशिनाथ भिल (वय २१, रा. टेकमिलाटी, ता. शिंदखेडा, जि. धुळे) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून स्टीलची ताटे, पातेली, तांब्याची भांडी, जेवणाचे डबे, तांब्याचा हांडा, पितळाचा हांडा तसेच गुन्ह्यात वापरलेली लोखंडी टॉमी असा एकूण अंदाजे २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांच्या तपासादरम्यान आरोपीने साथीदारांसह जुना शहादा रोडवरील भांड्याचे गोदाम फोडून चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याला संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल निलेश हालोरे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि शिरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिनेश सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक इमरान खान, पोलीस कॉन्स्टेबल हिरालाल सूर्यवंशी, प्रविण निकुंभे, निलेश हालोरे, निलेश धनगर आणि होमगार्ड अमिन शाहा यांनी केली.

Ad 1
Tags: Pandhurang Shimpi
Previous Post

प्रा. प्रकाश भांडारकर यांचा ‘प्रकाशवाट’ काव्यसंग्रह प्रकाशित!

Related Posts

गडचिरोलीत १२ हजारांची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता अटकेत
क्राईम

गडचिरोलीत १२ हजारांची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता अटकेत

October 29, 2026
3
२ किलो गांजासह एकास अटक
क्राईम

२ किलो गांजासह एकास अटक

October 29, 2026
3
क्राईम

तळवडेतील ७३ तोळे सोन्याच्या लुटीचा आठ तासांत उलगडा; तिघांना अटक

October 18, 2026
8
बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप
क्राईम

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

October 2, 2026
115
क्राईम

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

September 27, 2026
94
ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

August 14, 2026
21

ताज्या बातम्या

दोंडाईच्यातील भांड्याच्या गोदामातील चोरीचा गुन्हा उघड; मुद्देमाल व हत्यारासह आरोपी अटकेत!

दोंडाईच्यातील भांड्याच्या गोदामातील चोरीचा गुन्हा उघड; मुद्देमाल व हत्यारासह आरोपी अटकेत!

November 7, 2026
प्रा. प्रकाश भांडारकर यांचा ‘प्रकाशवाट’ काव्यसंग्रह प्रकाशित!

प्रा. प्रकाश भांडारकर यांचा ‘प्रकाशवाट’ काव्यसंग्रह प्रकाशित!

November 7, 2026
श्रीगोंद्याच्या कन्येची जपानमध्ये उत्तुंग भरारी! आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र परिषदेत ऐश्वर्या लोणकरचे संशोधन पेपरचे यशस्वी सादरीकरण

श्रीगोंद्याच्या कन्येची जपानमध्ये उत्तुंग भरारी! आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र परिषदेत ऐश्वर्या लोणकरचे संशोधन पेपरचे यशस्वी सादरीकरण

November 7, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In