• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिरढोण–कुरुंदवाड मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू; पुलावरील पाणी ओसरले, मात्र जलपर्णीचा विळखा कायम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :

RelatedPosts

रोटरी क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी शिवाजी बाबर; सचिवपदी अमित पाटील यांची निवड

रक्षाबंधनापासून महिलांना दरमहा ₹2,500? ‘महिला समृद्धी योजना’बाबत चर्चा; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

मंगळवेढा-पंढरपूरला मोठा दिलासा! म्हैसाळ योजनेचे पाणी कालव्यात; कॅनॉलद्वारे सिंचनाला चालना, ८ तास वीजपुरवठ्यालाही मंजुरी

कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील शिरढोण–कुरुंदवाड दरम्यानच्या पुलावरील पुराचे पाणी ओसरल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र, पुलाला जलपर्णीचा मोठ्या प्रमाणात विळखा कायम असल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली होती. त्यामुळे शिरढोण–कुरुंदवाड हा प्रमुख मार्ग सलग तीन दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला होता. गेल्या दोन-तीन दिवसांत पावसाचा जोर कमी झाल्याने नदीची पाणीपातळी घटली आणि आज हा मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

आज सकाळी पुलावरील पाणी पूर्णपणे ओसरले असले, तरी पुलावर मोठ्या प्रमाणात जलपर्णी अडकून राहिल्याने रस्त्यावर तिचा जाड थर साचला होता. त्यामुळे वाहतूक सुरू करण्यात अडचणी निर्माण झाल्या. सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने पुलावरील जलपर्णी हटवून मार्ग वाहतुकीसाठी खुला केला.

दरम्यान, पुराच्या पाण्यासोबत आलेली जलपर्णी पुलालगतच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात साचली आहे. पाणी ओसरल्यानंतरही ही जलपर्णी शेतातच अडकल्याने पिकांचे नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. प्रशासनाने वेळेत जलपर्णी हटवली असती तर हे नुकसान टाळता आले असते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. तसेच पुलाला अजूनही जलपर्णीचा विळखा कायम असून पुरामुळे पुलावरील लोखंडी बॅरिकेडचेही नुकसान झाले आहे. पुलावरील उर्वरित जलपर्णी हटवून पूल पूर्णपणे सुरक्षित करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

रक्षाबंधनापासून महिलांना दरमहा ₹2,500? ‘महिला समृद्धी योजना’बाबत चर्चा; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

Next Post

रोटरी क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी शिवाजी बाबर; सचिवपदी अमित पाटील यांची निवड

Related Posts

ताज्या घडामोडी

रोटरी क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी शिवाजी बाबर; सचिवपदी अमित पाटील यांची निवड

July 12, 2026
2
ताज्या घडामोडी

रक्षाबंधनापासून महिलांना दरमहा ₹2,500? ‘महिला समृद्धी योजना’बाबत चर्चा; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

July 12, 2026
0
ताज्या घडामोडी

मंगळवेढा-पंढरपूरला मोठा दिलासा! म्हैसाळ योजनेचे पाणी कालव्यात; कॅनॉलद्वारे सिंचनाला चालना, ८ तास वीजपुरवठ्यालाही मंजुरी

July 12, 2026
0
ताज्या घडामोडी

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आरोग्य उपक्रम; २,५७० भाविकांना मोफत वैद्यकीय तपासणी

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

July 11, 2026
3
ताज्या घडामोडी

माले (ता. पन्हाळा) येथील खेळाडूंची ‘साई’ सेंटरमध्ये निवड; क्रीडा साहित्याचे वाटप

July 11, 2026
7
Next Post

रोटरी क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी शिवाजी बाबर; सचिवपदी अमित पाटील यांची निवड

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी शिवाजी बाबर; सचिवपदी अमित पाटील यांची निवड

July 12, 2026

शिरढोण–कुरुंदवाड मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू; पुलावरील पाणी ओसरले, मात्र जलपर्णीचा विळखा कायम

July 12, 2026

रक्षाबंधनापासून महिलांना दरमहा ₹2,500? ‘महिला समृद्धी योजना’बाबत चर्चा; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

July 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In