• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रोटरी क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी शिवाजी बाबर; सचिवपदी अमित पाटील यांची निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
80
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी :

कुरुंदवाड : रोटरी क्लब ऑफ कुरुंदवाडचा २८ वा पदग्रहण सोहळा शुक्रवारी (१० जुलै) बालाजी मिनी मंगल कार्यालय, कुरुंदवाड येथे उत्साहात पार पडला. यावेळी शिवाजी बाबर यांची अध्यक्षपदी, अमित पाटील यांची सचिवपदी तर हिंदुराव तावदारे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

कार्यक्रमाची सुरुवात मावळते अध्यक्ष रो. शैलेश व्होरा यांना कॉलर प्रदान करून झाली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोटरीचे संस्थापक पॉल हॅरिस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली, तर फोर वे टेस्टचे वाचन रो. अजित पाटील यांनी केले.

या सोहळ्यास डीजीएन (२०२८-२९) रो. वासुकी संजी आणि असिस्टंट गव्हर्नर रो. हर्षवर्धन फडणीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांचा परिचय व स्वागत रो. प्रदीप पाटील (सर) यांनी केले.

यावेळी रो. प्रशांत पट्टेकरी यांनी २०२५-२६ या वर्षातील कार्याचा आढावा सादर केला. मावळते अध्यक्ष रो. शैलेश व्होरा यांनी सर्व सदस्यांचे सहकार्याबद्दल आभार मानत नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. नव्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी रो. शिवाजी बाबर, सचिवपदी रो. अमित पाटील, खजिनदारपदी रो. हिंदुराव तावदारे, तर आयपीपी रो. शैलेश व्होरा, प्रेसिडेंट इलेक्ट रो. डॉ. संजय पाटील, क्लब अॅडमिन रो. अनिकेत पाटील, फाउंडेशन रो. सोमनाथ सुतार, सर्व्हिस प्रोजेक्ट रो. सचिन औरवाडे, पब्लिक इमेज रो. शैलेश व्होरा आणि पोलिओ प्लस रो. डॉ. किरण आणुजे यांची निवड करण्यात आली.

यावेळी विक्रम कडाळे आणि उत्कर्ष निकम यांना रोटरीचे सदस्यत्व प्रदान करण्यात आले. तसेच मावळते अध्यक्ष, सचिव व खजिनदार यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. रो. सोमनाथ सुतार यांचा लेह-लडाख बाईक सफरीबद्दल विशेष गौरव करण्यात आला.

नूतन अध्यक्ष रो. शिवाजी बाबर यांनी आगामी वर्षातील समाजोपयोगी उपक्रमांची रूपरेषा मांडली. असिस्टंट गव्हर्नर रो. हर्षवर्धन फडणीस यांनी शुभेच्छा दिल्या, तर रो. वासुकी संजी यांनी रोटरीच्या समाजसेवेची भूमिका स्पष्ट करत नव्या कार्यकारिणीला मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास कुरुंदवाड, तेरवाड, टाकळी परिसरातील मान्यवर, रोटरी क्लब शिरोळ व जयसिंगपूरचे सदस्य तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. अजित पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन रो. अमित पाटील यांनी मानले. राष्ट्रगीत आणि स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Ad 1
Tags: Darikant Kolekar
Previous Post

शिरढोण–कुरुंदवाड मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू; पुलावरील पाणी ओसरले, मात्र जलपर्णीचा विळखा कायम

Next Post

केळवारोड पूरस्थितीची प्रांत अधिकाऱ्यांकडून पाहणी; पूर नियंत्रणासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post

केळवारोड पूरस्थितीची प्रांत अधिकाऱ्यांकडून पाहणी; पूर नियंत्रणासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In