• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मंगळवेढा-पंढरपूरला मोठा दिलासा! म्हैसाळ योजनेचे पाणी कालव्यात; कॅनॉलद्वारे सिंचनाला चालना, ८ तास वीजपुरवठ्यालाही मंजुरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

पंढरपूर | प्रतिनिधी :

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत, म्हैसाळ योजनेचे पाणी कालव्यातून सोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच पंढरपूर तालुक्यातील कॅनॉलच्या लाभक्षेत्रातही सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार असून शेतीपंपांसाठी आठ तास वीजपुरवठा करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे कृष्णा व पंचगंगा नद्यांतील पुराचे अतिरिक्त पाणी म्हैसाळ योजनेच्या वितरिका क्रमांक १, २ तसेच उमदी वितरिकेत सोडण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत संबंधित विभागाने कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात केली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता मासाळ यांनी दिली.

सध्या कृष्णा व पंचगंगा नदी खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असताना सोलापूर जिल्ह्यात, विशेषतः मंगळवेढा व पंढरपूर परिसरात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे पेरणी रखडली असून शेतकरी पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जात आहेत. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पाणी कालव्यांद्वारे उपलब्ध करून देण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

याशिवाय, वीर धरणातील पाणीसाठा वाढल्याने निरा भाटघर उजवा कालवा (NRBC) प्रणालीद्वारे पंढरपूर तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांना सिंचनासाठी पाणी सोडण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत शेतीपंपांसाठी सध्या मिळणारा दोन तासांचा वीजपुरवठा वाढवून आठ तास करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत हा निर्णय अमलात येणार असल्याचे सांगण्यात आले.

या निर्णयांमुळे मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असून खरीप हंगामाला मोठा आधार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोठा बदल; पीईटी स्कॅनचा समावेश, कर्करोग उपचारांसाठी वाढीव मदत

Next Post

रक्षाबंधनापासून महिलांना दरमहा ₹2,500? ‘महिला समृद्धी योजना’बाबत चर्चा; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
7
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post

रक्षाबंधनापासून महिलांना दरमहा ₹2,500? ‘महिला समृद्धी योजना’बाबत चर्चा; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In