• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘पंढरीची वारी… मानवतेची शाळा’; वारीतून माणुसकीचा घेतलेला अनुभव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 13, 2026
in Blog
0
0
SHARES
20
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी

“सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया…” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळी अनेकांनी ऐकल्या असतील; मात्र त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर पंढरपूरची वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून मानवतेची, समतेची आणि सेवाभावाची शाळा असल्याची भावना आर.एस.पी. रस्ता वाहतूक सुरक्षा अधिकारी तथा कला शिक्षक यश महाजन यांनी व्यक्त केली आहे.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

पुणे ते सोलापूर मार्गावर पंढरपूर वारीदरम्यान आर.एस.पी. रस्ता वाहतूक सुरक्षा अधिकारी म्हणून काम करताना तसेच ठाणे जिल्हा शिक्षण कार्यालयाच्या आदेशानुसार उल्लास नवभारत साक्षरता अभियान, शिक्षण संचालनालय, पुणे यांच्या साक्षरता वारी व वाहतूक सुरक्षा अभियानात सहभागी होताना त्यांना वारीचे अनोखे दर्शन घडले.

यश महाजन यांनी आपल्या अनुभवात म्हटले आहे की, वारी म्हणजे केवळ पायी चालण्याचा प्रवास नसून श्रद्धा, समता, सेवा आणि प्रेमाचा अखंड उत्सव आहे. लाखो वारकरी शिस्तबद्ध पद्धतीने विठ्ठल नामाचा गजर करत पुढे जात असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तीचे तेज आणि विठ्ठल भेटीची आस स्पष्ट दिसत होती.

वारीतील अन्नदान परंपरेने त्यांना विशेष भावूक केले. विविध ठिकाणी वारकऱ्यांसाठी प्रेमाने वाढले जाणारे बाजरीची भाकरी, बेसन, ठेचा, डाळ-भात, मसालेभात, उसाचा रस, बिस्किटे, फळे, पोहे तसेच इतर खाद्यपदार्थ यामध्ये केवळ चव नव्हती, तर मायेचा स्पर्श होता, असे त्यांनी नमूद केले.

तसेच एवढ्या मोठ्या जनसमुदायाचे व्यवस्थापन करताना पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभागाने दाखवलेला संयम, नियोजन आणि सेवाभावही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

वारीत प्रत्येक जण एकमेकांना “माऊली” म्हणून संबोधतो, येथे श्रीमंत-गरीब, मोठा-लहान असा कोणताही भेद नसतो. परस्परांप्रती असलेला आदर, प्रेम, मदतीची भावना आणि बंधुभाव हीच वारीची खरी ओळख असल्याचे त्यांनी आपल्या अनुभवातून मांडले.

शाळेत दररोज म्हणण्यात येणाऱ्या “भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत” या प्रतिज्ञेचा खरा अर्थ पंढरपूर वारीत अनुभवायला मिळाला. वारीतील प्रेम, समता, सेवा आणि माणुसकीचा संदेश समाजाने दैनंदिन जीवनात स्वीकारला, तर अधिक सुसंस्कृत आणि बंधुभाव जपणारा भारत घडू शकतो, असा विश्वास यश महाजन यांनी व्यक्त केला.

त्यांच्या मते, पंढरपूरची वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून मानवतेचे धडे देणारे, संस्कार घडवणारे आणि भारतीय संस्कृतीचे जिवंत विद्यापीठ आहे.

Ad 1
Previous Post

पेरणीनंतर पावसाने दिली दडी; उगवलेली पिके वाढ खुंटल्याने शेतकरी चिंतेत

Next Post

ज्येष्ठांच्या ११ प्रलंबित मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा करणार – आमदार मंदाताई म्हात्रे

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

ज्येष्ठांच्या ११ प्रलंबित मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा करणार – आमदार मंदाताई म्हात्रे

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In