• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गोविंदपूर येथे श्री संत गजानन महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत; हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 13, 2026
in Blog
0
गोविंदपूर येथे श्री संत गजानन महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत; हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरण
0
SHARES
185
VIEWS
Ad 1
Ad 1

गोविंदपूर | प्रतिनिधी :

श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे गोविंदपूर येथे सोमवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. सुमारे ७०० वारकऱ्यांच्या ताफ्यासह पालखीचे आगमन होताच “अनंत कोटी ब्रह्मांडनायक… श्री संत गजानन महाराज की जय”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भगवे ध्वज, टाळ-मृदंगाचा गजर, फुलांची उधळण, रांगोळ्या आणि फटाक्यांच्या आतषबाजीने श्रींचे स्वागत करण्यात आले.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

पालखीचे स्वागत वैभव मुंडे (संचालक, जिल्हा मजूर संघ, धाराशिव) यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामसेवक अशोक आमले, सरपंच अशोक मस्के, मधुकर मिसाळ, वसंत जाधव, सूर्यकांत मुंडे, पत्रकार अविनाश सावंत, विश्वास केंगार, हिरालाल मुंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोविंदपूरसह देवधानोरा, हासेगाव, जवळा, एकुरका, बोरगाव, गौरगाव, नागुलगाव, खामसवाडी, नागझरवाडी, मंगरूळ, माळकरंजा, देवळाली आदी परिसरातील हजारो भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. पालखी आगमनानंतर परिसर भगवेमय झाला असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

बेसन-भाकरी महाप्रसादाची अनोखी परंपरा

गोविंदपूर येथील बेसन-भाकरीचा महाप्रसाद ही या पालखी सोहळ्याची खास परंपरा आहे. यासाठी संपूर्ण गावातून ज्वारी, गहू, डाळ, कांदा, लसूण आणि मिरची असा शिधा जमा केला जातो. यंदा सुमारे ५० क्विंटल ज्वारी आणि ४ क्विंटल डाळ जमा करण्यात आली. गावातील प्रत्येक घरातून तयार केलेल्या भाकऱ्या मंदिरात जमा करून वारकऱ्यांना महाप्रसाद देण्यात आला.

याशिवाय ७ हजार पाण्याच्या बाटल्या, ६०० ज्यूस पॅक, ५० किलो लोणचे, कांदा तसेच ३०० किलो जिलेबी व लाडू यांचेही वाटप करण्यात आले. अनेक भाविकांनी भाकरी, केळी, चिवडा आदी साहित्याचेही वितरण केले.

मोफत सेवा व रक्तदान शिबिर

वारकऱ्यांसाठी बालाजी सुरवसे आणि खंडू सुरवसे यांनी मोफत दाढी-कटिंग सेवा दिली. विराज मेडिकलचे औंदुबर मुंडे यांनी मोफत वैद्यकीय तपासणी व औषधांचे वितरण केले. तसेच रेणुका ब्लड बँक, धाराशिव यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

पालखी सोहळ्यादरम्यान शिराढोण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. आर. घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. विश्रांतीनंतर श्रींची पालखी पुढील मुक्कामासाठी ढोकी तेरणा कारखाना येथे रवाना झाली.

Ad 1
Previous Post

पाथरीत वाळू माफियांचा हैदोस; जप्त हायवा पळवण्यासाठी सिनेस्टाईल थरार, महसूल कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतला प्रकार

Next Post

आलेगाव एस.टी. बस सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा : निलेश तोताराम कापकर

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

आलेगाव एस.टी. बस सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा : निलेश तोताराम कापकर

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In