• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पहिल्याच पावसात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याची दुरवस्था; घोणसपूर ग्रामस्थांची चौकशी व तातडीच्या दुरुस्तीची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 13, 2026
in Blog
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1
Ad 1

महाबळेश्वर | प्रतिनिधी

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या प्रजमा २६ ते घोणसपूर (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) या रस्त्याची पहिल्याच पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी तसेच रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे.

RD-SAT(II)-A-256 या पॅकेजअंतर्गत सुमारे ४.७५५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम १० जानेवारी २०२५ रोजी सुरू करण्यात आले होते. हे काम मे. उदय डी. जाधव कन्स्ट्रक्शन, रत्नप्रभा कन्स्ट्रक्शन व मंगलश्याम कन्स्ट्रक्शन (जे.व्ही.), वाई, जि. सातारा यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले.

मात्र जुलै २०२६ मध्ये झालेल्या पहिल्याच पावसात रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडणे, डांबरीकरण उखडणे आणि रस्त्याची झपाट्याने दुरवस्था होणे अशा प्रकारामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाच्या नियमांनुसार या रस्त्यासाठी १० वर्षांची देखभाल व हमी देण्यात आल्याचे नामफलकावर नमूद असतानाही काही महिन्यांतच रस्ता खराब झाल्याने ही हमी केवळ कागदोपत्रीच राहिली का, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

घोणसपूर हे गाव प्राचीन स्वयंभू शिवालय, शिवकालीन ऐतिहासिक मधू मकरंदगड आणि समृद्ध नैसर्गिक वारसा यामुळे प्रसिद्ध आहे. वर्षभर भाविक, गडभ्रमंती करणारे पर्यटक, ट्रेकर्स तसेच दुर्मिळ औषधी वनस्पतींचा अभ्यास करणारे देशी-विदेशी पर्यटक या परिसराला भेट देत असल्याने या रस्त्याला पर्यटनाच्या दृष्टीनेही मोठे महत्त्व आहे.

गावातील बहुतांश नागरिक शेतीवर अवलंबून असून दैनंदिन दळणवळणासाठी हाच प्रमुख मार्ग आहे. अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर आमदार मकरंद आबा पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हा रस्ता मंजूर झाला. मात्र काही महिन्यांतच त्याची झालेली दुरवस्था पाहून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

खराब रस्त्यामुळे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून काही ठिकाणी रुग्णांना डोलीच्या साहाय्याने उपचारासाठी नेण्याची वेळ येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

ग्रामस्थांनी या कामाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करून निकृष्ट दर्जाच्या कामासाठी जबाबदार असलेल्या संबंधितांवर कठोर कारवाई करावी तसेच कंत्राटातील अटींनुसार रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून दर्जेदार काम पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे.

यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी घोणसपूर गावातील स्वयंभू शिवालय, ऐतिहासिक मधू मकरंदगड आणि परिसराच्या पर्यटन व धार्मिक महत्त्वाचा विचार करून संबंधित यंत्रणांना तातडीने आवश्यक निर्देश द्यावेत, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

चौकट

  • मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याची पहिल्याच पावसात दुरवस्था.
  • अनेक ठिकाणी खड्डे, डांबरीकरण उखडल्याने नागरिक त्रस्त.
  • रस्त्यासाठी १० वर्षांची देखभाल व हमी; गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह.
  • पर्यटन व दळणवळणासाठी महत्त्वाच्या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी.
  • निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाईची ग्रामस्थांची मागणी.
Ad 1
Previous Post

शिरपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; किराणा दुकानातील चोरीचा अवघ्या चार तासांत छडा, दोन आरोपी अटकेत

Next Post

फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ किसान सभेचे आंदोलन; जीआरची होळी करून शासनाविरोधात निदर्शने

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ किसान सभेचे आंदोलन; जीआरची होळी करून शासनाविरोधात निदर्शने

फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ किसान सभेचे आंदोलन; जीआरची होळी करून शासनाविरोधात निदर्शने

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In