• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दिंडोरी रस्त्यावर कोयता गँगचा थरार; तरुणावर हल्ला, मुख्य संशयितासह विधीसंघर्षित बालक ताब्यात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 13, 2026
in Blog
0
0
SHARES
54
VIEWS
Ad 1
Ad 1

| नाशिक प्रतिनिधी

नाशिक शहरातील दिंडोरी रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ रविवारी (दि. १२) सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास कोयता गँगने दहशत माजविल्याची घटना घडली. पाच जणांच्या टोळक्याने हातात धारदार कोयते घेऊन परिसरात धिंगाणा घालत एका तरुणावर हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शौर्य सतीश गरुड (वय १८, रा. साई संदेश सोसायटी, कलानगर, दिंडोरी रोड) हा आपल्या चार साथीदारांसह घटनास्थळी आला होता. जुन्या वादातून त्यांनी प्रथमेश गायकवाड याला गाठून त्याच्यावर धारदार कोयत्याने हल्ला केला.

हल्ल्यानंतर संशयितांनी हातातील कोयते हवेत फिरवत रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच नागरिकांच्या अंगावर कोयते उगारून त्यांचा पाठलाग केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शिताफीने सापळा रचून मुख्य संशयित शौर्य गरुड आणि त्याच्यासोबत असलेल्या एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील धारदार कोयते जप्त करण्यात आले आहेत.

या गुन्ह्यात सहभागी असलेल्या उर्वरित तीन संशयितांचा पोलीस शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.

चौकट

  • दिंडोरी रस्त्यावर कोयता गँगचा थरार.
  • जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला.
  • रस्त्यावर कोयते फिरवत नागरिकांमध्ये दहशत.
  • मुख्य संशयितासह विधीसंघर्षित बालक पोलिसांच्या ताब्यात.
  • उर्वरित तीन संशयितांचा शोध सुरू.
Ad 1
Previous Post

फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ किसान सभेचे आंदोलन; जीआरची होळी करून शासनाविरोधात निदर्शने

Next Post

नशाला नकार, बालविवाहाला आळा; छत्रपती संभाजीनगरात जनजागृती अभियानाचा शुभारंभ

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
नशाला नकार, बालविवाहाला आळा; छत्रपती संभाजीनगरात जनजागृती अभियानाचा शुभारंभ

नशाला नकार, बालविवाहाला आळा; छत्रपती संभाजीनगरात जनजागृती अभियानाचा शुभारंभ

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In