• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिरपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; किराणा दुकानातील चोरीचा अवघ्या चार तासांत छडा, दोन आरोपी अटकेत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 13, 2026
in Blog
0
0
SHARES
35
VIEWS
Ad 1

शिरपूर | प्रतिनिधी

RelatedPosts

प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

जनता सहकारी बँक आजराची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न; सभासदांना १०% लाभांशासह कर्मचाऱ्यांना पगारवाढ

शिरपूर शहरातील अक्षद ट्रेडिंग किराणा दुकानात झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या चार तासांत छडा लावत शिरपूर शहर पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून चोरीस गेलेली ₹१४ हजारांची संपूर्ण रोकड हस्तगत केली. सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे पोलिसांच्या तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ८ जुलै २०२६ रोजी रात्री ८.३० ते ९ जुलै रोजी सकाळी ९.३० या कालावधीत फिर्यादी मनीष मोहनलाल अग्रवाल (रा. बोहरी गल्ली, बालाजी मंदिराजवळ, शिरपूर) यांच्या अक्षद ट्रेडिंग या किराणा दुकानातून अज्ञात चोरट्यांनी ₹१४ हजारांची रोकड चोरून नेली.

याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (अ), ३३१(३) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या चार तासांत मतीन खलील तेली आणि मकसूद अख्तर मेहतर (दोघेही रा. लोहार गल्ली, शिरपूर) यांना ताब्यात घेतले.

सखोल चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी चोरीची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून ₹१४ हजार किमतीच्या ₹१००, ₹५०, ₹२०, ₹१०, ₹५, ₹२ आणि ₹१ मूल्याच्या एकूण २,०५९ चलनी नोटा व नाणी जप्त करण्यात आली. त्यामुळे चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

या प्रभावी कारवाईमुळे गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला असून आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार रविंद्र आखडमल, अतुल पाटील, आरीफ तडवी, सोमा ठाकरे, सचिन वाघ, गोविंद कोळी, विनोद आखडमल, भटू साळुंके, योगेश दाभाडे, मनोज दाभाडे, प्रशांत पवार आणि मनोज महाजन यांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

चौकट

  • अवघ्या ४ तासांत चोरीचा गुन्हा उघड.
  • २ आरोपी अटकेत.
  • चोरीस गेलेली ₹१४ हजारांची संपूर्ण रोकड जप्त.
  • सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे यशस्वी कारवाई.
  • शिरपूर शहर पोलिसांच्या तत्पर कामगिरीचे नागरिकांकडून स्वागत.
Previous Post

वडज धरण तुडुंब; पाणीसाठा वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा, अतिवृष्टीने भात शेतीला फटका

Next Post

पहिल्याच पावसात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याची दुरवस्था; घोणसपूर ग्रामस्थांची चौकशी व तातडीच्या दुरुस्तीची मागणी

Related Posts

प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात
Blog

प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
3
व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
Blog

व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

August 16, 2026
1
जनता सहकारी बँक आजराची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न; सभासदांना १०% लाभांशासह कर्मचाऱ्यांना पगारवाढ
Blog

जनता सहकारी बँक आजराची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न; सभासदांना १०% लाभांशासह कर्मचाऱ्यांना पगारवाढ

August 16, 2026
21
गारुडीमुक्त नागपंचमी साजरी करा.
Blog

गारुडीमुक्त नागपंचमी साजरी करा.

August 16, 2026
2
कॉस्मोग्लोबल मानवाधिकार विचार संघमच्या राष्ट्रीय कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
Blog

कॉस्मोग्लोबल मानवाधिकार विचार संघमच्या राष्ट्रीय कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 16, 2026
2
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
Blog

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
1
Next Post

पहिल्याच पावसात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याची दुरवस्था; घोणसपूर ग्रामस्थांची चौकशी व तातडीच्या दुरुस्तीची मागणी

ताज्या बातम्या

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

August 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In