• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उर्दू शाळेसाठी सोनपेठ नगर परिषदेचा ऐतिहासिक ठराव; जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
13
VIEWS
Ad 1
Ad 1

सोनपेठ | प्रतिनिधी :

सोनपेठ शहरातील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना मातृभाषेत दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सोनपेठ नगर परिषदेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नगराध्यक्ष परमेश्वर भैय्या कदम यांच्या विशेष पुढाकारातून नगर परिषद हद्दीत जिल्हा परिषद अंतर्गत नवीन उर्दू शाळा सुरू करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा परिषद, परभणीकडे पाठविण्यात आला आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

दि. ३ जुलै २०२६ रोजी झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय ऐनवेळी मांडण्यात आला. सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांनी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळावा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी स्वतंत्र उर्दू शाळेची आवश्यकता असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

या विषयावरील चर्चेदरम्यान गटनेते हाजी शेख इमामोद्दीन उर्फ सद्दाम मुस्ताक हुसेन, गटनेत्या सौ. सारिका श्रीकांत भोसले यांच्यासह सर्व नगरसेवकांनी प्रस्तावाला एकमुखी पाठिंबा दर्शविला. त्यानंतर हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

नगर परिषदेच्या या निर्णयामुळे सोनपेठ शहर व तालुक्यातील अल्पसंख्याक समाजामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षणाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी व्यक्त केली.

अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल नगराध्यक्ष परमेश्वर भैय्या कदम तसेच सर्व नगरसेवकांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. हा ठराव प्रत्यक्षात येऊन लवकरात लवकर उर्दू शाळा सुरू व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

Ad 1
Tags: RAmesh Mulgir
Previous Post

मानवत बसस्थानकात शालेय विद्यार्थिनीच्या हस्ते वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

Next Post

श्रीगोंदा नगरपरिषदेचा ऐतिहासिक निर्णय; ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची गुंठेवारी व शासकीय जागेवरील अतिक्रमणे होणार नियमानुकूल

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

श्रीगोंदा नगरपरिषदेचा ऐतिहासिक निर्णय; ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची गुंठेवारी व शासकीय जागेवरील अतिक्रमणे होणार नियमानुकूल

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In