• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नंदुरबारमध्ये जिल्हा दिव्यांग समितीची बैठक; विविध कल्याणकारी योजना व कृती आराखड्यास मंजुरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा | प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दिव्यांग समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत सन २०२६-२७ च्या जिल्हा वार्षिक निधीअंतर्गत विविध योजनांच्या कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या ५ टक्के दिव्यांग निधीच्या खर्चाचा व आगामी नियोजनाचा आढावा घेण्यात आला.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

बैठकीत दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी तालुकानिहाय निवारा केंद्र सुरू करणे, मनू देवी फाउंडेशनच्या माध्यमातून संगणक, शिवणकाम, ब्युटी पार्लर आदी अभ्यासक्रमांसाठी ६० दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू करणे, प्लंबिंग, वेल्डिंग व इतर व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, दिव्यांग खेळाडूंना क्रीडा निधी देणे, दिव्यांग विद्यार्थी किंवा पालकांना वार्षिक ₹५ हजार शैक्षणिक सहाय्य तसेच अंथरुणाला खिळलेल्या दिव्यांगांसाठी घरगुती सुविधा व औषधोपचारासाठी ₹३ हजारांची तरतूद करण्यास मंजुरी देण्यात आली. सर्व पात्र दिव्यांगांना तातडीने यूडीआयडी (UDID) कार्ड उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राज्य उपाध्यक्ष शिवाजीराव मोरे यांनी शासकीय व निमशासकीय इमारतींमध्ये दिव्यांगांसाठी बॅरिअर-फ्री सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली. त्यावर जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासूनच या उपक्रमाची सुरुवात करण्यात आल्याचे सांगत, हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

बैठकीदरम्यान दिव्यांग संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदनही सादर केले. यामध्ये संजय गांधी योजनेचे लेखी आदेश देणे, सिव्हिल रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीनंतर टोकन पावती देणे, बसस्थानक ते सिव्हिल रुग्णालय वाहतूक सुविधा उपलब्ध करणे, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत सुधारणा, ग्रामपंचायतींकडील ५ टक्के दिव्यांग निधीचा प्रभावी वापर आणि अंत्योदय रेशनकार्ड तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

बैठकीला जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी तथा समितीचे सचिव नंदकिशोर सूर्यवंशी, विविध विभागांचे अधिकारी तसेच दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Tags: Netradipak Kuwar
Previous Post

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणावर पँथर सेनेचा हल्लाबोल; SIT चौकशीची मागणी

Next Post

वादळी पावसाचा कुडणला तडाखा; केळी बागांचे लाखो रुपयांचे नुकसान, मदतीची शेतकऱ्यांची मागणी

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
वादळी पावसाचा कुडणला तडाखा; केळी बागांचे लाखो रुपयांचे नुकसान, मदतीची शेतकऱ्यांची मागणी

वादळी पावसाचा कुडणला तडाखा; केळी बागांचे लाखो रुपयांचे नुकसान, मदतीची शेतकऱ्यांची मागणी

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In