• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वादळी पावसाचा कुडणला तडाखा; केळी बागांचे लाखो रुपयांचे नुकसान, मदतीची शेतकऱ्यांची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
वादळी पावसाचा कुडणला तडाखा; केळी बागांचे लाखो रुपयांचे नुकसान, मदतीची शेतकऱ्यांची मागणी
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

पालघर | प्रतिनिधी –

पालघर जिल्ह्यातील कुडण (ता. पालघर) परिसरात झालेल्या वादळी व मुसळधार पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे शेकडो केळीची झाडे जमीनदोस्त झाली असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

कुडण येथील शेतकरी अनिल मोरेश्वर म्हात्रे यांच्या सुमारे दोन एकर क्षेत्रातील १,५०० केळीच्या झाडांपैकी जवळपास ८०० झाडे वादळी वाऱ्यामुळे कोसळली. काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या या पिकाचे अंदाजे १.८० ते २ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच आमदार राजेंद्र गावित यांनी नुकसानग्रस्त शेताची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. शासनाकडून तातडीने पंचनामा करून योग्य नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, कुडणचे चेअरमन हितेंद्र (बाळू) पाटील, उपाध्यक्ष शेखर राऊत, पोलीस पाटील कल्पेश म्हात्रे, सरपंच विजय म्हात्रे, ग्रामसेवक भागवत कांबळे, ग्रामपंचायत सदस्य राहुल ठाकूर, निकिता पाटील, मुनीर बाळाशी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा सुरू करण्यात आला असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत, योग्य नुकसानभरपाई आणि पीकविमा योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

वादळी पावसामुळे केळीबरोबरच इतर पिकांनाही फटका बसल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून शासनाने त्वरित मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Ad 1
Tags: Kevil Patil
Previous Post

नंदुरबारमध्ये जिल्हा दिव्यांग समितीची बैठक; विविध कल्याणकारी योजना व कृती आराखड्यास मंजुरी

Next Post

बेकायदेशीर मुरूम उत्खननामुळे पाझर तलावाला धोका; तात्काळ कारवाईची मागणी

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

बेकायदेशीर मुरूम उत्खननामुळे पाझर तलावाला धोका; तात्काळ कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In