प्रतिनीधी, महादेव काळे
🙏🏻 आज दिनांक 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवास शुभारंभ होत आहे. नवरात्रोत्सवामध्ये नऊ दिवस नऊ रंगांचे पोशाख परिधान करण्यासही विशेष महत्त्व आहे.
यंदाच्या नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी कोणत्या रंगाने दुर्गामातेची पूजा करावी आणि या रंगांचे महत्त्व काय आहे? जाणून घ्या..🟡
3 ऑक्टोबर 2024, गुरुवार – पिवळा रंग* * पिवळा रंग हा आशावादी आणि आनंदाचे प्रतीक आहे. 🟢 *4 ऑक्टोबर 2024, शुक्रवार – हिरवा रंग* * हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे.
हिरवा रंग हा प्रगती, शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो. हिरवा रंग आयुष्यातील नवीन सुरुवातही दर्शवतो.🔘 *5 ऑक्टोबर 2024, शनिवार – राखाडी रंग* * राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे.
🟠 *6 ऑक्टोबर 2024, रविवार – नारिंगी रंग* * केशरी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गाची पूजा केल्यास ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती येऊ शकते. केशरी रंग हा सकारात्मकता आणि उत्साहाचे प्रतीक आहे⚪
*7 ऑक्टोबर 2024, सोमवार – पांढरा रंग* * पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणाचे प्रतीक आहे. पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना प्रदान करतो.🛑 *8 ऑक्टोबर 2024 मंगळवार – लाल रंग* * लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे. देवीला लाल रंगाची ओढणी अर्पण करणे शुभ मानले जाते.
🌐 *9 ऑक्टोबर 2024 बुधवार – निळा रंग* * निळा रंग वापरल्यास अतुलनीय आनंदाची अनुभूती येऊ शकते. हा रंग सुख, समृद्धी आणि शांतता दर्शवतो.🟣 *10 ऑक्टोबर 2024 गुरुवार – गुलाबी रंग* * गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो. या दिवशी महाष्टमी आहे, देवी महागौरीचे पूजन करून कन्या पूजन देखील करणे शुभ असते🔵
11 ऑक्टोबर 2024 शुक्रवार – जांभळा रंग* * जांभळा रंग भव्यता आणि राजेशाहीचे प्रतीक मानला जातो. या रंगामुळे भाविकांना सुख-समृद्धी मिळते, असे मानले जाते. 🦚 *12 ऑक्टोबर शनिवार – मोरपंखी रंग* * मोरपंखी रंगामुळे जीवनात समृद्धी येण्यास मदत मिळते, असे म्हणतात.🙏🏻
Discussion about this post