• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या दिंडीला ट्रकची धडक; सांगलीतील तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, सात जण जखमी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in Blog
0
0
SHARES
34
VIEWS
Ad 1
Ad 1

सांगली | प्रतिनिधी | सारथी महाराष्ट्राचा न्यूज

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

आषाढी वारीदरम्यान सोमवारी (१३ जुलै) सकाळी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात जेजुरीजवळील बेलसर फाटा परिसरात वारकऱ्यांच्या दिंडीला ट्रकची धडक बसून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सांगली जिल्ह्यातील तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा मार्गस्थ असताना नांदेडच्या दिंडीचा ट्रक सांगली जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जेजुरी येथील आनंदी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मृत वारकरी

  • नंदा बाबुराव पवार (वय ६०), रा. कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली
  • माधवी राजाराम सलगरे (वय ५५), रा. मालगाव, ता. मिरज, जि. सांगली
  • राजश्री शंकर भोसले (वय ५५), रा. कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली

जखमी वारकरी

  • शांता शिवाप्पा अलकोपर (वय ७०), रा. मिरजवाडी, ता. मिरज
  • कासाबाई जगन्नाथ गस्ते (वय ७०), रा. आष्टा, ता. वाळवा
  • लक्ष्मी विठ्ठल गडदे (वय ४५), रा. नांगोळे, ता. कवठेमहांकाळ
  • अक्काताई बबन कोळी (वय ६०), रा. शिरगाव, ता. तासगाव
  • शैलजा दिनकर जगताप (वय ५८), रा. कवलापूर, ता. मिरज
  • गीताबाई सदाशिव हंकारे (वय ६५), रा. कसबे डिग्रज, ता. मिरज
  • मंगल विलास पाटील (वय ६५), रा. कवलापूर, ता. मिरज

या दुर्घटनेनंतर वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी पालखी मार्गावरील वाहतूक नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वारकऱ्यांच्या दिंड्या आणि वाहनांसाठी स्वतंत्र मार्गाची व्यवस्था असती, तर अशी दुर्घटना टाळता आली असती, असे त्यांनी सांगितले. पुढील काळात पालखी मार्गावरील वाहतूक व्यवस्थापन अधिक काटेकोरपणे करण्याची मागणीही त्यांनी केली.

‘विठ्ठल रखुमाई’ योजनेची माहिती

राज्य शासनाच्या ‘विठ्ठल रखुमाई’ योजनेनुसार वारीच्या कालावधीत अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या वारसांना ४ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही योजना पायी किंवा वाहनाने पंढरपूरला जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना लागू असून, लाभासाठी पंढरपूर यात्रेबाबतचे तहसीलदारांचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

Ad 1
Previous Post

पाटणबोरीतील रस्ता बांधकाम संथगतीने; नागरिकांचा संताप, तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी

Next Post

पीएमजीपी वसाहत तळीराम व अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचा अड्डा बनल्याचा नागरिकांचा आरोप; कारवाईची मागणी

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

पीएमजीपी वसाहत तळीराम व अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचा अड्डा बनल्याचा नागरिकांचा आरोप; कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In