• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

NH-965G वरील अपघात रोखण्यासाठी शिवसेनेचा एल्गार; उपविभागीय अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा, आज शेगावात NHAI अधिकाऱ्यांची बैठक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in Blog
0
0
SHARES
24
VIEWS
Ad 1
Ad 1

जत प्रतिनिधी :

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965G (NH-965G) वरील शेगाव (ता. जत) परिसरात वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. धोकादायक ठरलेल्या ‘ब्लॅक स्पॉट’वर तातडीने उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी शिवसेना जत तालुक्याच्या वतीने १६ जुलै रोजी ‘रस्ता रोको’ आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

या पार्श्वभूमीवर शिवसेना जत तालुकाप्रमुख अंकुश हुवाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जतचे उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत सविस्तर चर्चा केली. बैठकीनंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अधिकाऱ्यांना शेगाव येथे भेट देण्याचे निर्देश दिले आहेत.

आज शेगावात NHAI अधिकाऱ्यांची बैठक

उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि NHAI पंढरपूर विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून १५ जुलै रोजी शेगाव येथे ग्रामस्थांसोबत बैठक घेण्याचे निर्देश दिले. या बैठकीत अपघात रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत प्रशासनाची भूमिका लेखी स्वरूपात मांडण्यासही सांगण्यात आले आहे.

शिवसेनेच्या प्रमुख मागण्या

  • शेगाव येथील धोकादायक ब्लॅक स्पॉटवर तातडीने स्पीड ब्रेकर बसविण्यात यावेत.
  • वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक आणि इशारा फलक उभारावेत.
  • महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी तांत्रिक उपाययोजना तातडीने राबवाव्यात.

बैठकीच्या निर्णयावर आंदोलनाची दिशा

शिवसेनेच्या आंदोलनाला शेगाव ग्रामस्थांसह विविध पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे हे आंदोलन सर्वपक्षीय स्वरूप धारण करत आहे. आज होणाऱ्या बैठकीतील निर्णयानंतर १६ जुलै रोजी प्रस्तावित रस्ता रोको आंदोलनाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

शेगाव ग्रामपंचायत येथे होणाऱ्या या बैठकीस सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

या बैठकीस शिवसेना तालुकाप्रमुख अंकुश हुवाळे, वैद्यकीय सहायता कक्ष तालुकाप्रमुख दीपक बुरुटे, उपतालुकाप्रमुख चंद्रकांत शिंदे, शिवसेना नेते दर्याप्पा जतकर, शिवकुमार शिंदे तसेच ओम साई प्रतिष्ठान, शेगावचे अध्यक्ष मारुती (बबलू) शिंदे उपस्थित होते.

Ad 1
Tags: Arun Koli
Previous Post

जत तालुक्यात पावसाने दडी मारली; पिके करपू लागल्याने दुबार पेरणीचे संकट

Next Post

नवेगाव–उंबरवाडी परिसरात अवैध दारूविक्रीविरोधात महिलांचा एल्गार; ९ ऑगस्टला जनआक्रोश मोर्चाचा इशारा

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

नवेगाव–उंबरवाडी परिसरात अवैध दारूविक्रीविरोधात महिलांचा एल्गार; ९ ऑगस्टला जनआक्रोश मोर्चाचा इशारा

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In