• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नवेगाव–उंबरवाडी परिसरात अवैध दारूविक्रीविरोधात महिलांचा एल्गार; ९ ऑगस्टला जनआक्रोश मोर्चाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in Blog
0
0
SHARES
66
VIEWS
Ad 1
Ad 1

ता. पातूर | प्रतिनिधी

पातूर तालुक्यातील नवेगाव–उंबरवाडी तसेच परिसरातील गावांमध्ये सुरू असलेल्या कथित अवैध गावठी दारूविक्रीविरोधात महिला व ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या पुढाकाराने प्रशासनाकडे निवेदन देत अवैध दारूविक्री तातडीने बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, परिसरात अनेक दिवसांपासून अवैध दारूची विक्री सुरू असून त्यामुळे तरुणांमध्ये आणि अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. अनेक कुटुंबांवर त्याचे गंभीर परिणाम होत असून दारूच्या नशेत वाहन चालविण्यामुळे अपघातांची संख्याही वाढत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

नागरिकांनी यापूर्वीही संबंधित प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्याचा दावा करत, अपेक्षित कारवाई होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे अवैध दारूविक्री तात्काळ बंद करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात २९ जून २०२६ रोजी सावरगाव–झरंडी मार्गावर झालेल्या भीषण अपघाताचाही उल्लेख करण्यात आला आहे. या अपघातात आकाश शेषराव शिंदे आणि अजय चोंढकर या दोन युवकांचा मृत्यू झाला, तर तिसरा युवक गंभीर जखमी होऊन नागपूर येथील रुग्णालयात उपचार घेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अवैध दारूविक्रीवर प्रभावी नियंत्रण नसल्याबद्दल नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, अकोला जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आल्याची माहिती देत, तातडीने कारवाई न झाल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर ९ ऑगस्ट (क्रांती दिन) रोजी आलेगाव, कार्ला, गोळेगाव, पाडशिंगी, सावरगाव, झरंडी, नवेगाव, उंबरवाडी, अंधारसांगवी, पांढुर्णा, सोनुना, पिंपळडोळी आदी गावांतील महिला-पुरुषांच्या सहभागातून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

या वेळी दुर्गाबाई ठाकरे, लताबाई डुकरे, शीतल धंदरे, रूपाली वाथे, शोभा डाखोरे, शालिनी वाथे, कमलाबाई ताजने, लक्ष्मीबाई तिवाले, पारूबाई गायकवाड, कमलाबाई धंदरे, रुक्मा शिंदे, निलेश तोताराम कापकर, समाधान शिंदे आणि समाधान गाढवे यांच्यासह अनेक महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

NH-965G वरील अपघात रोखण्यासाठी शिवसेनेचा एल्गार; उपविभागीय अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा, आज शेगावात NHAI अधिकाऱ्यांची बैठक

Next Post

कवठे महांकाळ तालुक्यात पावसाने दडी मारली; पाणीटंचाईमुळे खरीप हंगाम धोक्यात

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

कवठे महांकाळ तालुक्यात पावसाने दडी मारली; पाणीटंचाईमुळे खरीप हंगाम धोक्यात

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In