• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्या नेतृत्वात दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in Blog
0
0
SHARES
33
VIEWS
Ad 1
Ad 1

अवैध दारूविरोधात ९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाची घोषणा

पातूर | प्रतिनिधी :

नवेगाव–उंबरवाडी तसेच परिसरातील गावांमध्ये सुरू असलेल्या कथित अवैध गावठी दारू विक्रीविरोधात सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी एल्गार पुकारला आहे. अवैध दारू विक्रीमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून अनेक कुटुंबांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याने प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

दारूमुळे वाढते अपघात आणि सामाजिक समस्या

गेल्या काही दिवसांपासून नवेगाव, उंबरवाडी आणि परिसरातील गावांमध्ये अवैध दारूची विक्री होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकारामुळे अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच दारूच्या नशेत वाहन चालविल्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.

दुर्दैवी अपघातानंतर संताप

दि. २९ जून २०२६ रोजी सावरगाव–झरंडी मार्गावर दारूच्या नशेत वाहन चालविल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात आकाश शेषराव शिंदे आणि अजय चोंढकर या दोन युवकांचा मृत्यू झाला, तर तिसरा युवक नागपूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार घेत आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून अवैध दारूविरोधात कठोर कारवाईची मागणी अधिक जोर धरू लागली आहे.

प्रशासनाला निवेदन

या पार्श्वभूमीवर निलेश कापकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी अकोला जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच चान्नी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले. परिसरातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा भविष्यात निर्माण होणाऱ्या कोणत्याही गंभीर परिस्थितीची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.

९ ऑगस्टला जनआक्रोश मोर्चा

क्रांती दिनानिमित्त ९ ऑगस्ट रोजी आलेगाव, कार्ला, गोळेगाव, पाडशिंगी, सावरगाव, झरंडी, नवेगाव, उंबरवाडी, अंधारसांगवी, पांढुर्णा, सोनुना, पिंपळडोळी आणि परिसरातील महिला-पुरुषांच्या सहभागातून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश एल्गार मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.

प्रमुख उपस्थिती

या आंदोलनात दुर्गाबाई डिंगबर ठाकरे, लताबाई सीताराम डुकरे, शीतल प्रकाश धंदरे, रूपाली अमोल वाथे, शोभा बंडू डाखोरे, शालिनी बबन वाथे, कमलाबाई प्रकाश ताजने, लक्ष्मीबाई विष्णू तिवाले, पारूबाई विजय गायकवाड, कमलाबाई रमेश धंदरे, रुक्मा किशन शिंदे, समाधान झांगुजी शिंदे, समाधान गाढवे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

Ad 1
Tags: Pradip Tajne
Previous Post

चोपण-चनोडा येथील विद्यार्थ्यांसाठी मनसेचे राजू उंबरकर यांचा पुढाकार; स्वखर्चातून बससेवा सुरू

Next Post

ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीसाठी विधानसभेत आ. विजय वडेट्टीवार यांचा बुलंद आवाज; संघर्ष समितीकडून जंगी सत्कार

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीसाठी विधानसभेत आ. विजय वडेट्टीवार यांचा बुलंद आवाज; संघर्ष समितीकडून जंगी सत्कार

ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीसाठी विधानसभेत आ. विजय वडेट्टीवार यांचा बुलंद आवाज; संघर्ष समितीकडून जंगी सत्कार

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In