• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीसाठी विधानसभेत आ. विजय वडेट्टीवार यांचा बुलंद आवाज; संघर्ष समितीकडून जंगी सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in Blog
0
ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीसाठी विधानसभेत आ. विजय वडेट्टीवार यांचा बुलंद आवाज; संघर्ष समितीकडून जंगी सत्कार
0
SHARES
8
VIEWS
Ad 1
Ad 1

ब्रह्मपुरी | | दि. १३ जुलै २०२६

विधानसभेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरीला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याची जोरदार मागणी करत विधानसभेत बुलंद आवाज उठविला. त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करत ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समिती आणि परिसरातील नागरिकांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

‘ब्रह्मपुरी जिल्हा ही काळाची गरज’

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. देविदास जगनाडे यांनी ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीची गरज अधोरेखित केली. ब्रह्मपुरीसह नागभीड, सिंदेवाही, सावली आणि परिसरातील नागरिकांच्या प्रशासकीय सोयी व विकासासाठी स्वतंत्र जिल्हा होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार वडेट्टीवार यांनी विधानसभेत मांडलेल्या ठाम भूमिकेचे कौतुक करत संघर्ष समितीतर्फे शहरात ठिकठिकाणी अभिनंदनाचे फलक लावण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

‘ब्रह्मपुरी जिल्हा झाल्याशिवाय गप्प बसणार नाही’ – विजय वडेट्टीवार

सत्काराला उत्तर देताना आमदार विजयभाऊ वडेट्टीवार म्हणाले, “ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीचा प्रश्न मी विधानसभेत अत्यंत ठामपणे मांडला आहे. जोपर्यंत ब्रह्मपुरीला जिल्ह्याचा दर्जा मिळत नाही, तोपर्यंत प्रत्येक अधिवेशनात हा मुद्दा लावून धरणार आहे. ब्रह्मपुरी जिल्हा झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.”

आवश्यक असल्यास नवीन तहसीलांची निर्मिती करूनही हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ब्रह्मपुरी परिसराचा सर्वांगीण विकास हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

मान्यवरांची उपस्थिती

या सत्कार सोहळ्यास निमंत्रक प्राचार्य सुयोग बाळबुद्धे, प्रशांत डांगे, नगराध्यक्ष योगेश मिसार, उपाध्यक्ष डॉ. नितीन उराडे, नगरसेवक प्रकाश खोब्रागडे, पुष्पांकर बांगरे, डॉ. बाळकृष्ण शेळके, लीलाधर झलके, शंकरराव उराडे, प्राचार्य डॉ. नामदेवराव कोकोडे, दत्तू टिकले, केशवराव करंबे, प्राचार्य डॉ. संजय हर्षे, खेमराज तिडके, गाजी पटेल यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो नागरिक उपस्थित होते.

आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी विधानसभेत घेतलेल्या भूमिकेमुळे ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीच्या मागणीला नव्याने बळ मिळाल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

Ad 1
Previous Post

सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्या नेतृत्वात दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार

Next Post

नारायणगाव कृषी बाजार समितीत कोथिंबिरीला प्रतिजोडी ₹97 चा भाव; उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

नारायणगाव कृषी बाजार समितीत कोथिंबिरीला प्रतिजोडी ₹97 चा भाव; उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In