• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाहतूक कोंडी, बुलेटचा कर्णकर्कश आवाज आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न; माहूर पोलिसांकडे निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 16, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1
Ad 1

माहूर प्रतिनिधी | सारथी महाराष्ट्राचा न्यूज

माहूर शहरातील बुलेट दुचाकींच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना होणारा त्रास तात्काळ थांबविण्यात यावा, महाविद्यालय परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवावी तसेच आठवडी बाजाराच्या दिवशी मुख्य रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ, माहूर तालुका यांच्या वतीने पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरात काही बुलेट दुचाकींमध्ये सायलेंसरमध्ये अनधिकृत बदल करून मोठ्या आवाजात वाहने चालविली जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशा वाहनांवर विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच शहरातील विविध महाविद्यालय परिसरात छेडछाड व टवाळखोरीच्या घटना रोखण्यासाठी नियमित पोलीस गस्त वाढविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, दर सोमवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराच्या दिवशी मुख्य रस्त्यावर होणाऱ्या अनधिकृत अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे संबंधित अतिक्रमणे तातडीने हटवून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली.

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ, माहूर तालुका यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या या निवेदनावर पोलीस प्रशासनाने तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Ad 1
Tags: Kundan Tivadkar
Previous Post

बेकरीतील अस्वच्छतेचा पर्दाफाश; युवा क्रांती फाउंडेशनच्या पाहणीत गंभीर त्रुटींचा दावा

Next Post

बेंद्री ग्रामस्थांची महावितरण कार्यालयावर धडक; २४ तास वीजपुरवठ्याची मागणी, आठ दिवसांत तोडग्याचे आश्वासन

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
31
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
16
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
15
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
45
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

बेंद्री ग्रामस्थांची महावितरण कार्यालयावर धडक; २४ तास वीजपुरवठ्याची मागणी, आठ दिवसांत तोडग्याचे आश्वासन

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In