• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बेंद्री ग्रामस्थांची महावितरण कार्यालयावर धडक; २४ तास वीजपुरवठ्याची मागणी, आठ दिवसांत तोडग्याचे आश्वासन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 16, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

नायगाव प्रतिनिधी | सारथी महाराष्ट्राचा न्यूज

मौजे बेंद्री येथील ग्रामस्थांनी वारंवार होणाऱ्या वीज कपात व रात्रीच्या लोडशेडिंगच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने महावितरण कार्यालयात धडक देत तीव्र संताप व्यक्त केला. अनेक दिवसांपासून गावात नियमित वीजपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, तातडीने २४ तास अखंड वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

यावेळी ग्रामस्थांनी महावितरणचे अधिकारी पाटील साहेब व तेलंग साहेब यांची भेट घेऊन बेंद्री गावातील रात्रीचे लोडशेडिंग तात्काळ बंद करून अखंड वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली.

गावात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोबाईल चार्ज करण्यासाठी शेजारच्या गावात जावे लागत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा विपरीत परिणाम होत असून, शेतकरी, व्यापारी आणि लघु व्यावसायिकांचेही मोठे नुकसान होत असल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली. उकाड्याच्या वातावरणात लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागत असून, रात्री वीज नसल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून आरोग्याचाही प्रश्न गंभीर बनल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या समस्येमुळे नागरिकांचा संयम संपत आला असून, प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.

ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत महावितरणचे अधिकारी पाटील साहेब व तेलंग साहेब यांनी बेंद्री गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल तसेच पुढील आठ दिवसांत २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले.

यावेळी राम पाटील चिखलिकर, ज्ञानेश्वर पाटील बेंद्रिकर, अरुण पाटील हासनाबादे, निळकंठ साहेब (आर्मी), सुनील पाटील बेंद्रिकर, अजित पाटील बेंद्रिकर, माधव पाटील, दत्ता मंगरुळे बेंद्रिकर, जनार्धन टोंपे, बसवेश्वर पाटील बेंद्रिकर, पोलीस पाटील गोविंद बेंद्रिकर, बालाजी माचापूरे, सचिन पाटील कदम, परमेश्वर पाटील कदम, कपिल हासनाबादे यांच्यासह गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास बेंद्री ग्रामस्थांच्या वतीने तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला.

Ad 1
Tags: Dipak Gajbhare
Previous Post

वाहतूक कोंडी, बुलेटचा कर्णकर्कश आवाज आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न; माहूर पोलिसांकडे निवेदन

Next Post

आ. संजय भाऊ बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
31
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
16
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
15
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
45
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

आ. संजय भाऊ बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In