• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोगस बियाणांचा पर्दाफाश! शेतकऱ्यांच्या बांधावर खासदार बळवंत वानखडे; चौकशीचे आदेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 16, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

अमरावती प्रतिनिधी | सारथी महाराष्ट्राचा न्यूज

अमरावती लोकसभा मतदारसंघातील अचलपूर तालुक्यातील रावळगाव परिसरात बियाणे उगवले नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारींची खासदार बळवंत वानखडे यांनी तातडीने दखल घेत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तालुका कृषी अधिकारी अक्षय क्षीरसागर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांसोबत करण्यात आलेल्या पाहणीत अनेक शेतांमध्ये बियाण्यांची अत्यल्प उगवण झाल्याचे, तर काही ठिकाणी बियाणे पूर्णपणे न उगवल्याचे निदर्शनास आले.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी निकृष्ट व बोगस बियाणांमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची व्यथा खासदार वानखडे यांच्यासमोर मांडली. अनेक शेतांमध्ये केवळ १० ते २० टक्केच उगवण झाल्याचे, तर काही ठिकाणी बियाणे अजिबात उगवले नसल्याचे त्यांनी सांगितले. उगवलेल्या पिकाचाही दर्जा समाधानकारक नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली.

शेतकऱ्यांनी बूस्टर, ओसवाल तसेच इतर काही कंपन्यांच्या बियाणांबाबत गंभीर आक्षेप नोंदवले. निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले असून त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भार पडत असल्याचे त्यांनी सांगितले.

या गंभीर प्रकाराची दखल घेत खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत संबंधित बियाणा कंपन्या आणि विक्रेत्यांची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले. दोषी आढळणाऱ्या कंपन्या व विक्रेत्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना योग्य ती भरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.

यावेळी तालुका कृषी अधिकारी अक्षय क्षीरसागर, माजी पंचायत समिती उपसभापती श्रीधरभाऊ काळे, चेतन जवंजाळ, सुनील पवार, स्वप्निल राऊत, सुभाष खांडेकर, गोलू अतकरे, राजेंद्र राऊत, प्रकाश राऊत, हर्षल जवंजाळ, प्रशांत भडांगे, जुबेर भाई यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

□ बॉक्स : खासदारांच्या प्रमुख सूचना

  • बोगस व निकृष्ट बियाण्यांची तातडीने चौकशी करावी.
  • संबंधित कंपन्या व विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करावेत.
  • बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी.
  • दोषींवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.
Ad 1
Previous Post

आकाश दुबैया हत्या प्रकरण : आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी; एसपींच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

Next Post

दीड वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत कुमठा जलशुद्धीकरण केंद्र; शुद्ध पाण्यापासून ग्रामस्थ वंचित

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
31
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
16
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
14
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
45
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

दीड वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत कुमठा जलशुद्धीकरण केंद्र; शुद्ध पाण्यापासून ग्रामस्थ वंचित

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In