• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेतकऱ्यावर अन्याय सहन केला जाणार नाही; गरज पडल्यास आंदोलन करू – बाळराजे पवार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 16, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी; प्रशासनाकडून वरिष्ठांशी चर्चा करून निर्णयाचे आश्वासन

📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | गेवराई | प्रतिनिधी

गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंदफणा व गोदावरी नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. त्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या, उभी पिके वाहून गेली असून त्यांना योग्य मोबदला मिळालाच पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा भाजप नेते बाळराजे पवार यांनी दिला.

RelatedPosts

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

गेवराई तालुक्यातील सिंदफणा व गोदावरी नदीकाठच्या शेतजमिनी सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात खरडून गेल्या होत्या. या नैसर्गिक आपत्तीत उभी पिके तसेच मोसंबी, आंबा व सीताफळाच्या फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कृषी विभाग, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी संयुक्त पंचनामेही केले होते.

हिरापूर, टाकळगाव, कानडा पिंपळगाव आणि एरंडगाव या चार गावांतील सुमारे २५० एकर शेतजमिनीचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद असतानाही शासनाच्या मदत यादीत केवळ १० ते १२ शेतकऱ्यांचीच नावे समाविष्ट झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच या शेतकऱ्यांनाही केवळ पाच हजार रुपयांची मदत मंजूर झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. १३) भाजप नेते बाळराजे पवार यांनी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसह तहसील कार्यालयात जाऊन उपविभागीय अधिकारी शुभम पवार व तहसीलदार संजय सोनवणे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करत प्रशासनासमोर त्यांची बाजू ठामपणे मांडली.

यावर उपविभागीय अधिकारी शुभम पवार व तहसीलदार संजय सोनवणे यांनी या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन पुढील योग्य निर्णय घेतला जाईल व शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, असे आश्वासन दिले.

यावेळी नगरपरिषदेचे माजी सभापती भरत गायकवाड, प्रा. येळापुरे, अशोक चव्हाण, सरपंच घाटूळ काका, सचिन गव्हाणे, जगन्नाथ गव्हाणे, दिनेश निर्मळ, दत्ता ढोरमारे, राजू पटेल, इस्माईल पटेल, गजानन गव्हाणे, बाबू गव्हाणे, राहून धापसे, किशोर धापसे, रामप्रसाद गव्हाणे, महेश गव्हाणे, सुनील गिरी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Previous Post

रेणापूरमध्ये SIR-2026 मोहिमेला वेग; मतदार पडताळणीचे काम युद्धपातळीवर

Next Post

येडशी परिसरात रहस्यमय ‘गुड’ आवाजांचे सत्र; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Related Posts

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन
Blog

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

August 30, 2026
18
लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।
Blog

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

August 30, 2026
32
Blog

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

August 30, 2026
7
डॉ गोविंद नांदेडे यांच्या ३८ पदव्या, सात सुवर्णपदकांची विश्वविक्रमात नोंद
Blog

डॉ गोविंद नांदेडे यांच्या ३८ पदव्या, सात सुवर्णपदकांची विश्वविक्रमात नोंद

August 30, 2026
50
बोरिवली मध्ये राष्ट्रीय भटके विमुक्त मुक्ती दिन मोठ्या उत्साहात संपन्न.
Blog

बोरिवली मध्ये राष्ट्रीय भटके विमुक्त मुक्ती दिन मोठ्या उत्साहात संपन्न.

August 30, 2026
52
Blog

श्रीराम लीला शैक्षणिक सोसायटी व्दारा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी रत्न पुरस्कार २०२६ करिता प्रस्ताव पाठवावे.

August 30, 2026
3
Next Post

येडशी परिसरात रहस्यमय ‘गुड’ आवाजांचे सत्र; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ताज्या बातम्या

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

August 30, 2026
लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

August 30, 2026

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

August 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In