• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

येडशी परिसरात रहस्यमय ‘गुड’ आवाजांचे सत्र; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 16, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

वारंवार होणाऱ्या मोठ्या आवाजांबाबत प्रशासनाकडून खुलाशाची मागणी

📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | धाराशिव | प्रतिनिधी :

धाराशिव तालुक्यातील येडशी व परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार मोठ्या आवाजांचे (‘गुड’ आवाज) सत्र सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दहा-बारा दिवसांच्या अंतराने हे आवाज ऐकू येत असून, त्याची तीव्रता वाढत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे.

RelatedPosts

पत्रकार व समाजसेवक श्री विष्णुदास रामदास वैष्णव यांना ‘नाशिक भूषण’ पुरस्कार जाहीर

कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर पाटोदा आगारात सकारात्मक चर्चा; पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण

ऑनलाईन टास्कच्या आमिषातून तरुणांना देशविघातक कारवायांत ओढण्याचा प्रयत्न?; तपास यंत्रणांचे सतर्कतेचे आवाहन

मिळालेल्या माहितीनुसार, १५ जुलै रोजी सकाळी १०.०५ व १०.३५ वाजता मोठे आवाज झाल्याने गाव हादरल्याचा अनुभव नागरिकांनी व्यक्त केला. त्यानंतर १६ जुलै रोजी सकाळी ९.०७ वाजताही अशाच प्रकारचा आवाज ऐकू आल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे आवाज नेमके कशामुळे होत आहेत, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. भूगर्भातील हालचाली, डोंगर परिसरातील खडी क्रशर, शेतातील विहिरींची खोदकामे, रस्त्यावरून जाणारी अवजड वाहने किंवा अन्य कोणते कारण यामागे असू शकते का, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही अशा प्रकारचे आवाज झाले होते. मात्र सध्या होणाऱ्या आवाजांची तीव्रता अधिक असल्याने घरांतील वस्तूंना हादरे बसत असून नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.

या रहस्यमय आवाजांचे नेमके कारण शोधून नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी वरिष्ठ प्रशासनाने तातडीने चौकशी करून अधिकृत खुलासा करावा, अशी मागणी सामाजिक स्तरातून जोर धरत आहे.

Tags: Vikas Wagh
Previous Post

शेतकऱ्यावर अन्याय सहन केला जाणार नाही; गरज पडल्यास आंदोलन करू – बाळराजे पवार

Next Post

ऑनलाईन टास्कच्या आमिषातून तरुणांना देशविघातक कारवायांत ओढण्याचा प्रयत्न?; तपास यंत्रणांचे सतर्कतेचे आवाहन

Related Posts

Blog

पत्रकार व समाजसेवक श्री विष्णुदास रामदास वैष्णव यांना ‘नाशिक भूषण’ पुरस्कार जाहीर

July 16, 2026
0
Blog

कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर पाटोदा आगारात सकारात्मक चर्चा; पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण

July 16, 2026
2
Blog

ऑनलाईन टास्कच्या आमिषातून तरुणांना देशविघातक कारवायांत ओढण्याचा प्रयत्न?; तपास यंत्रणांचे सतर्कतेचे आवाहन

July 16, 2026
3
Blog

शेतकऱ्यावर अन्याय सहन केला जाणार नाही; गरज पडल्यास आंदोलन करू – बाळराजे पवार

July 16, 2026
0
Blog

रसाळ दिंडीचा वेगळा उपक्रम; दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन

July 16, 2026
0
Blog

निलेश कापकर यांच्या पाठपुराव्याला यश; आलेगाव–अकोला एस.टी. बस सेवा पूर्ववत सुरू

July 16, 2026
3
Next Post

ऑनलाईन टास्कच्या आमिषातून तरुणांना देशविघातक कारवायांत ओढण्याचा प्रयत्न?; तपास यंत्रणांचे सतर्कतेचे आवाहन

ताज्या बातम्या

पत्रकार व समाजसेवक श्री विष्णुदास रामदास वैष्णव यांना ‘नाशिक भूषण’ पुरस्कार जाहीर

July 16, 2026

कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर पाटोदा आगारात सकारात्मक चर्चा; पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण

July 16, 2026

ऑनलाईन टास्कच्या आमिषातून तरुणांना देशविघातक कारवायांत ओढण्याचा प्रयत्न?; तपास यंत्रणांचे सतर्कतेचे आवाहन

July 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In