



महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून गावामधील महिला समूहांना मार्गदर्शन करण्यात आला व गावामध्ये विविध विकासाच्या योजना उमेद अभियानाच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत असे प्रतिपादन जिल्हा व्यवस्थापक द्वारकादास राठोड साहेब यांनी केले.
या गावाचे भूमिपुत्र श्री हनुमंत कंदुरके यांनी गावातील लोकांना उमेदच्या माध्यमातून विकासाच्या वाटा निर्माण झालेल्या आहेत असे सांगितले.
कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी गावातील मुख्य रस्त्यावरील सुका कचरा व ओला कचरा याचं विल्हेवाट करण्याचं काम उमेद अभियानाच्या टीमने करण्यात आले.
आणि त्यानंतर सर्व गावकऱ्यांना, महिलांना स्वच्छतेची शपथ तालुका व्यवस्थापक इरवंत सूर्यकार यांनी दिली.
या महिला ग्रामसभेला गावातील सरपंच श्री. गणेश पवार ग्रामपंचायत अधिकारी श्री . कदम , ग्राम संघाचे पदाधिकारी महिला स्वयंसहायता समूहाचे संपूर्ण गावातील महिला व होटाळा
गावातील समूह संसाधन व्यक्ती श्रीमती होनसांगडे , व समूह संसाधन व्यक्ती श्रीमती शालिनी कंदुरके, समूह संसाधन व्यक्ती निर्मला भोसले, समूह संसाधन व्यक्ती आफरीन शेख, समूह संसाधन व्यक्ती सुनीता बेलूरे, कौशल्य समन्वयक बालाजी गिरी, सामाजिक कार्यकर्ते श्री कोत्तेवार , गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आदींची उपस्थिती होती.
Discussion about this post