• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उलवेतील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक; तातडीने दुरुस्तीची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 17, 2026
in Blog
0
उलवेतील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक; तातडीने दुरुस्तीची मागणी
0
SHARES
12
VIEWS
Ad 1
Ad 1

उरण | प्रतिनिधी

उलवे नोडमधील सेक्टर 24, 25 आणि 25-अ परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली असून, खड्डे तातडीने न बुजवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

RelatedPosts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

गुरुवारी (दि. 16) मनसेचे पदाधिकारी व स्थानिक महिलांनी सिडकोचे अधिकारी योगेश गोसावी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे संबंधित परिसरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सेक्टर 24, 25 आणि 25-अ मधील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. “रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांत रस्ते आहेत, हेच समजत नाही,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.

यावेळी सिडको अधिकारी योगेश गोसावी यांनी पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून लवकरात लवकर सर्व खड्डे बुजविण्यात येतील, असे आश्वासन दिले. मात्र, आश्वासनाची पूर्तता न झाल्यास रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेने लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

या वेळी उलवेचे माजी शहराध्यक्ष राहुल बाबुराव पाटील, मनिषा राहुल पाटील, सुनीता नामदेव पाटील, रेश्मा संदेश म्हात्रे, गव्हाण विभागाचे उपाध्यक्ष बबलू पाटील, पनवेल तालुका सचिव निर्दोष केशव गोंधळी, उलवे शहराध्यक्ष आकाश देशमुख यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडले असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कोणतीही गंभीर दुर्घटना होण्यापूर्वी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी मनसेने केली आहे.

Ad 1
Previous Post

व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत असलेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

संत गजानन महाराज पालखी आगमनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
Blog

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
5
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Blog

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
3
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.
Blog

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026
26
Blog

दि-13आक्टेबंर2026 लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी महोदयांसोबत माजी मंत्री आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांची निलंगा विधानसभेतील सर्व लोकप्रतिनिधीसह महत्त्वपूर्ण बैठक संपन्न…!

October 16, 2026
3
नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
Blog

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

October 16, 2026
5
दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.
Blog

दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.

October 16, 2026
5
Next Post
संत गजानन महाराज पालखी आगमनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संत गजानन महाराज पालखी आगमनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In