• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

किनवट पोलिसांच्या तत्परतेने चार तासांत ८० हजारांची बॅग परत; प्रामाणिक रिक्षाचालकाचा गौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 17, 2026
in Blog
0
किनवट पोलिसांच्या तत्परतेने चार तासांत ८० हजारांची बॅग परत; प्रामाणिक रिक्षाचालकाचा गौरव
0
SHARES
54
VIEWS
Ad 1
Ad 1

किनवट | प्रतिनिधी

किनवट पोलिसांच्या तत्परतेमुळे, रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे रिक्षामध्ये विसरलेली सुमारे ८० हजार रुपये असलेली बॅग अवघ्या चार तासांत संबंधित महिलेच्या ताब्यात देण्यात आली. या घटनेमुळे किनवट पोलिसांसह प्रामाणिक रिक्षाचालकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

RelatedPosts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

दिग्रस येथील सौ. दिपाली अवधूत कदम या त्यांच्या आजीच्या निधनामुळे सकाळी साडेआठच्या सुमारास मुलांसह गावाकडे निघाल्या होत्या. दुपारी अंत्यविधीसाठी वेळेत पोहोचण्याच्या घाईत त्या गोकुंदा येथून रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी रिक्षामध्ये बसल्या. मात्र, प्रवासादरम्यान सुमारे ८० हजार रुपये असलेली बॅग त्या रिक्षातच विसरून गेल्या.

ही बाब लक्षात येताच त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर शिवसेना तालुकाध्यक्ष बालाजी मुरकुटे, युवासेना तालुकाध्यक्ष अतुल दर्शनवाड तसेच संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सचिन कदम यांनी रिक्षाचा शोध सुरू केला. त्याचवेळी किनवट पोलीस ठाण्याशी संपर्क साधून मदत मागण्यात आली.

पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी तत्काळ तपासाची सूत्रे हलवत संबंधित रिक्षाचा शोध सुरू केला. काही वेळातच चिखली (बु.) येथील रिक्षाचालक शेख सलीम यांच्याशी संपर्क साधण्यात आला. आपल्या रिक्षात बॅग असल्याचे लक्षात येताच त्यांनी कोणतीही छेडछाड न करता ती बॅग पोलिसांच्या स्वाधीन केली.

आवश्यक पडताळणी पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी अवघ्या चार तासांत ही बॅग महिलेचे पती अवधूत अशोक कदम यांच्या ताब्यात सुपूर्द केली. त्यामुळे कदम कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.

यावेळी बालाजी मुरकुटे, अतुल दर्शनवाड, सचिन कदम, रमेश कदम, अरविंद सूर्यवंशी, उत्तम डोंगरे, प्रमोद जाधव, अवधूत कदम, अझर शेख, शेख निजाम, शेख इब्राहिम आदी उपस्थित होते. तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल तुकाराम वाडगूरे, पोलीस कॉन्स्टेबल बाळू कुडमेथे आणि प्रामाणिक रिक्षाचालक शेख सलीम यांचा सत्कार करण्यात आला.

या उल्लेखनीय कामगिरीमुळे किनवट पोलिसांची कार्यतत्परता आणि रिक्षाचालक शेख सलीम यांचा प्रामाणिकपणा पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Ad 1
Previous Post

उंबरवाडीत अवैध दारूविक्रीवर पोलिसांची धडक कारवाई; व्यसनमुक्तीचा निर्धार

Next Post

राज्यात पावसाची अनियमितता कायम; हवामान खात्याचा इशारा, शेतकऱ्यांसमोर नवे आव्हान

Related Posts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
Blog

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
5
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Blog

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
3
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.
Blog

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026
26
Blog

दि-13आक्टेबंर2026 लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी महोदयांसोबत माजी मंत्री आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांची निलंगा विधानसभेतील सर्व लोकप्रतिनिधीसह महत्त्वपूर्ण बैठक संपन्न…!

October 16, 2026
3
नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
Blog

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

October 16, 2026
5
दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.
Blog

दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.

October 16, 2026
5
Next Post
राज्यात पावसाची अनियमितता कायम; हवामान खात्याचा इशारा, शेतकऱ्यांसमोर नवे आव्हान

राज्यात पावसाची अनियमितता कायम; हवामान खात्याचा इशारा, शेतकऱ्यांसमोर नवे आव्हान

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In