• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

इंद्रायणीच्या महापुराचा ‘श्री गोविंद महाराज केंद्र संस्थेला’ मोठा फटका; लाखो रुपयांचे नुकसान, तातडीच्या मदतीची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 19, 2026
in Blog
0
0
SHARES
31
VIEWS
Ad 1

पुणे/आळंदी | प्रतिनिधी

आळंदी तीर्थक्षेत्री इंद्रायणी नदीला ६ जुलै रोजी आलेल्या भीषण महापुरामुळे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील प्रतिष्ठित दिंडी क्रमांक ४३ – श्री गोविंद महाराज केंद्र संस्था मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. महापुरात अन्नधान्याचा साठा, धार्मिक साहित्य, रोख रक्कम, वाहन, महत्त्वाची कागदपत्रे तसेच इमारतीचे मोठे नुकसान झाल्याने संस्थेच्या वारीचे संपूर्ण नियोजन विस्कळीत झाले आहे.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

संस्थेचे कार्याध्यक्ष तथा भूमिदाता नानाजीभाई ठक्कर यांनी नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करून प्रशासनाने तातडीने पंचनामा करून जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. पाहणीवेळी माजी नगरसेवक मनोहर दिवाणे, नगरसेवक संतोष रायकर, विश्वस्त दशरथ कोल्हे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पाहणीनंतर नानाजीभाई ठक्कर यांनी आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्याशी संपर्क साधून महापुरामुळे झालेल्या नुकसानाची माहिती दिली. या नैसर्गिक आपत्तीची गंभीर दखल घेऊन शासनाने तातडीने नुकसानभरपाई मंजूर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

संस्थेने प्रशासनाकडे दिलेल्या पंचनामा अर्जानुसार, आगामी आषाढी वारीसाठी सुमारे ६,००० वारकरी आणि भाविकांच्या २० दिवसांच्या भोजनाची तयारी करण्यात आली होती. त्यासाठी साठवून ठेवलेले लाखो रुपयांचे अन्नधान्य महापुरात वाहून गेले. मंदिर, किचन, धार्मिक साहित्य, ग्रंथालय तसेच इमारतीच्या संरचनेचेही मोठे नुकसान झाले आहे.

पुराच्या पाण्यामुळे बाहेरील किचन शेड पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने गॅस शेगड्या, फ्रिज, भांडी, साऊंड सिस्टिमसह अनेक महागडी उपकरणे निकामी झाली. टाळ, मृदंग, पखवाज, वीणा यांसारखी धार्मिक वाद्ये तसेच ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथही खराब झाले आहेत.

याशिवाय पिण्याच्या पाण्याची बोअरवेल गाळाने बंद पडली असून १,००० लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. मुख्य कार्यालयातील महत्त्वाची शासकीय कागदपत्रे, हिशोबाच्या फायली, पावती पुस्तके, संगणक आणि फर्निचरही चिखलामुळे निकामी झाले आहे.

देणगी स्वरूपात संस्थेकडे असलेली सुमारे ३ लाख ४० हजार रुपयांची रोख रक्कम पुराच्या पाण्यात वाहून गेली असून संस्थेची बोलेरो वाहनही पूर्णपणे निकामी झाले आहे. त्यामुळे संस्थेवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.

वारकरी संप्रदायात सेवाभावी, धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी ओळख असलेल्या श्री गोविंद महाराज केंद्र संस्थेला पुन्हा पूर्ववत उभे करण्यासाठी शासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत मंजूर करावी, अशी मागणी संस्थेचे कार्याध्यक्ष नानाजीभाई ठक्कर आणि पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Tags: Shailaja Kulkarni
Previous Post

राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र गौरव पुरस्काराने समाजसेवक तथा युवा पत्रकार संजय चव्हाण यांचा गौरव

Next Post

आळंदीकरांनो सतर्क राहा! पिण्याचे पाणी उकळून व गाळूनच वापरा; नगरपरिषदेचे महत्त्वाचे आवाहन

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
56
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
80
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

आळंदीकरांनो सतर्क राहा! पिण्याचे पाणी उकळून व गाळूनच वापरा; नगरपरिषदेचे महत्त्वाचे आवाहन

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In