छत्रपती संभाजीनगर : शहरातील क्रांती चौक परिसरात आज हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांकडून दंडही वसूल करण्यात आला.
वाहतूक नियमांचे पालन करणे वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक असून, यापुढेही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला. कारवाईदरम्यान क्रांती चौक परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर करून वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
रिपोर्टर : निल.












