प्रतिनिधी-दरिकांत कोळेकर.
कुरुंदवाड :-येथील शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या.कुरुंदवाड या संस्थेबद्दल आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, आत्मियता सभासदांनी सहकार्या च्या माध्यमातून दाखविला आहे. त्यामुळे संस्था प्रगतीपथावर येण्यास मदत होत आहे. संस्थेच्या ठेवीमध्ये वाढ होऊन ती 40 कोटी, 70 लाख रुपये झाली आहे. संस्थेने 31 कोटी, 58 लाख रुपयाची कर्जे वितरित केली आहेत. संस्थेस 70 लाख रुपयाचा निव्वळ नफा झाला आहे. सभासदांना 15 % (टक्के) लाभांश देण्यात येणार असल्याचे सांगितले. नेहमीप्रमाणे सतत संस्थेस अ वर्ग मिळाला आहे.अशी माहिती शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्थेचे चेअरमन धोंडीराम बाबर यांनी दिली. ते जैन सांस्कृतिक भवन येथे संस्थेच्या 41 व्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून बोलत होते. बाबर यांनी स्वागत, प्रास्ताविक व अहवाल वाचन केले.
संस्थेची अधिकची माहिती सांगताना चेअरमन बाबर म्हणाले, ” संस्थेचे एकूण भाग भांडवल 3 कोटी, 34 लाख रुपये, राखीव निधी 2 कोटी, 88 लाख रुपये, गुंतवणूक 16 कोटी, 8 लाख, 27 हजार रुपये आहे.”
यावेळी विषय पत्रिकेचे वाचन मॅनेजर विलास कोळी यांनी केले सर्व विषयांना सभासदांनी वाजवी मतांनी मंजुरी दिली. शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रविकुमार पाटील, विठ्ठल भाट, मनोज रणदिवे, उत्तम सुतार, दशरथ खोत, विलास चव्हाण इत्यादी सभासदांनी सभेत प्रश्नांची भडीमार करत विचारले,
यावेळी व्हा. चेअरमन चंद्रकांत कांबळे, संचालिका श्रीमती जहाॅआरा शौकत अली जुगळे, इरफान भेंडवाडे, अमित कांबळे, सुनिल कळसापनावर, अशोक कोळी, सुनिल कोळी, परशुराम चव्हाण, बाळू यादव, विठू बंडगर, शकीलअहमद पीरजादे, सुभाष तराळ, सौ संगीता सुनिल खिलारे, अमानुल्लाह मुल्ला, शिवानंद मठपती, आनंदराव शिंदे आदी उपस्थित होते. तसेच पतसंस्थेचे कर्मचारी उत्तम खोत, रविंद्र गायकवाड, सुनिल खाडे, श्रीधर खबाले, श्रीमती अलका म्हावळे आदी उपस्थित होते.
खालील विषयावर सभासदांनी प्रश्नाचा भडीमार करत सभेत खडाजंगी झाली ….
१) एस. के. पाटील बँक मुदत ठेव 7 लाख रुपये,
२) धर्मनाथ पतसंस्था मुदत ठेव 5 लाख, 45 हजार रुपये,
३) कोल्हापूर जिल्हा शेतकरी सहकारी सूतगिरणी 80 हजार रुपये,
वरील संस्था बुडीत निघाल्या आहेत. त्यांचे नावावर असलेल्या रक्कमा दरवर्षी अहवालात येतात. याबद्दल सभासदांनी प्रश्न विचारले. मात्र याबाबत सभेत ठोस निर्णय झाला नाही.
असे काही प्रश्न अनुउत्तरीच राहिले. सभासदांचे समाधान संचालक मंडळ करू शकले नाहीत.









