बागलाण तालुकाध्यक्षपदी दिपक जगताप यांची निवड; तालुका कार्यकारिणीही गठित
बागलाण : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी ४५११, नाशिक जिल्हा शाखेच्या बागलाण शाखेची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी पंचायत समिती बागलाण येथील सभागृहात पार पडली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध सेवा विषयक व प्रशासकीय प्रश्नांसह संघटनेच्या आगामी कार्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
बैठकीचे प्रास्ताविक स्वप्नील (भैय्या) चंद्रकांत आहिरे यांनी केले. त्यानंतर पंचायत समिती बागलाणचे सहाय्यक गट विकास अधिकारी भैय्यासाहेब सावंत यांनी उपस्थित राहून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक व प्रशासकीय बाबींवर मार्गदर्शन केले. कर्मचारी व प्रशासन यांच्यात समन्वय व सुसंवाद राखून नियमांनुसार कामकाज करण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी स्पष्ट केली.
यानंतर राज्य सरचिटणीस गिरीशभाऊ दाभाडकर यांच्या आदेशानुसार स्वप्नील (भैय्या) चंद्रकांत आहिरे यांची नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी ४५११च्या सदस्य जोडणीच्या कार्यात स्वप्नील आहिरे यांचा सिंहाचा वाटा असल्याचे विभागीय अध्यक्ष सुभाष घोलप आणि जिल्हाध्यक्ष बापू मोरे यांनी सांगितले. सदस्य जोडणीच्या माध्यमातून संघटनेच्या विस्ताराच्या कार्यात त्यांचा सहभाग राहिल्याचे त्यांनी नमूद केले.
याच बैठकीत दिपक जगताप यांची बागलाण तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली. उपाध्यक्षपदी दिपक अहिरे व गिरीश चौधरी, सचिवपदी प्रदीप सोनवणे, सहसचिवपदी जिभाऊ देवरे, प्रसिद्धीप्रमुखपदी विजय पवार व प्रभाकर बोरसे, सल्लागारपदी सुनील जगताप, दिव्यांग प्रतिनिधीपदी तेजस अहिरे आणि महिला प्रतिनिधीपदी रेखा गांगुर्डे यांची निवड करण्यात आली. संघटक म्हणून शरद सावळा, कैलास वणीस, नरेश सोळंकी, कल्पेश अमृतकर, समाधान ठोके, हरिश्चंद्र पवार, सोमनाथ सोमवंशी, सचिन निकम, प्रकाश बेडसे, वाल्मीक हिरे, भाऊसाहेब खरे, विनोद गरुड आणि विशाल नेरकर यांची निवड करण्यात आली.
बैठकीस विभागीय अध्यक्ष सुभाष घोलप, जिल्हाध्यक्ष बापू मोरे, जिल्हा सचिव महेंद्र शांताराम मते, जिल्हा संघटक मनोहर काळू बेंडकोळी, निसार भाई शेख, निलेश गागुर्डे, गोरख जाधव,मंहेद्र हिरे,नाशिक तालुका सचिव दत्ता भैरू मांडे, नाशिक तालुका कार्याध्यक्ष तुकाराम निवृत्ती सदगीर तसेच पिनु पाटील (मालेगाव) उपस्थित होते. तसेच तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी गोकुळ सोनवणे, चैत्राम साबळे, प्रल्हाद खैरनार, भारत अहिरे, गौतम गरुड, हर्षद खैरनार, योगेश शेवाळे आदींसह तालुक्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.








