• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जात पडताळणी समितीला ‘टाळे ठोक’ आंदोलनाचा इशारा; महादेव कोळी समाजाच्या बैठकीत निर्धार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 19, 2026
in Blog
0
0
SHARES
64
VIEWS
Ad 1

परभणी | प्रतिनिधी

मराठवाड्यातील महादेव कोळी व मल्हार कोळी समाजाच्या जात पडताळणी प्रकरणांमध्ये सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप करत समाजबांधवांनी १० ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती (क्र. १) कार्यालयासमोर प्रतीकात्मक ‘टाळे ठोक’ आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. हा निर्णय परभणी व बीड जिल्ह्यातील महादेव कोळी समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

बैठकीत समाजाच्या प्रतिनिधींनी आरोप केला की, मराठवाड्यातील महादेव कोळी व मल्हार कोळी समाजाच्या संदर्भातील ब्रिटिशकालीन, निजामकालीन दस्तऐवज, गॅझेट, जनगणना नोंदी आणि संशोधनपर साहित्याचा पुरेसा विचार न करता केवळ जुन्या ‘कोळी’ नोंदींच्या आधारे अनेक प्रकरणे अवैध ठरवली जात आहेत.

समाजाच्या मते, अनुसूचित जमातींच्या यादीत क्रमांक २९ वर ‘कोळी महादेव’ आणि क्रमांक ३० वर ‘कोळी मल्हार’ या जमातींचा समावेश आहे. पुणे, ठाणे, नाशिक, नगर आणि रायगड जिल्ह्यांतील प्रकरणांमध्ये ‘कोळी’ नोंदीच्या आधारे वैधता प्रमाणपत्र दिले जाते, मात्र मराठवाड्यातील प्रकरणांमध्ये त्याच नोंदी नाकारल्या जात असल्याने भेदभाव होत असल्याचा आरोप करण्यात आला.

याच मुद्द्यावर समाजबांधवांनी प्रश्न उपस्थित करत, “एकाच आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीतील समितीकडून वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळे निकष का?” असा सवाल उपस्थित केला.

बैठकीत सांगण्यात आले की, यापूर्वी मे महिन्यात महादेव कोळी व मल्हार कोळी समाजाच्या वतीने १४ दिवसांचे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी प्रशासनाला ६० दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, मुदत संपूनही अपेक्षित तोडगा न निघाल्याने आता १० ऑगस्ट रोजी प्रतीकात्मक ‘टाळे ठोक’ आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या आंदोलनात मराठवाड्यातील महादेव कोळी व मल्हार कोळी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

बैठकीस रमेश पिठ्ठलवाड, गणेशराव सूर्यवंशी, अच्युतराव सोगे, किशोर सूर्यवंशी, रोहिदास एम्बलवाड, शंकर गंगाधरे, विश्वंभर मेकेवाड, गोविंद सोलेवाड, विठ्ठल बुधवारे, बंडू सौंदडे, राम चिंचलवाड, तुकाराम सोळंके, नागनाथ पोतलवाड, रामभाऊ वाघमारे, ॲड. राजू पिटले, कोंडीबा भंगे, रंगनाथ मामीलवाड, दादाराव नंदेवाड यांच्यासह महादेव कोळी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

आळंदीकरांनो सतर्क राहा! पिण्याचे पाणी उकळून व गाळूनच वापरा; नगरपरिषदेचे महत्त्वाचे आवाहन

Next Post

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, कळंब तालुका अध्यक्षपदी अमर चोंदे यांची बिनविरोध निवड

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
56
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
79
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, कळंब तालुका अध्यक्षपदी अमर चोंदे यांची बिनविरोध निवड

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In