• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते पांडुरंग माने यांचा शिवसेनेत प्रवेश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 21, 2026
in Blog
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

जामखेड | प्रतिनिधी :

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा भटक्या-विमुक्त सेलचे अध्यक्ष पांडुरंग माने यांनी रविवारी मुंबई येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे जामखेड तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले असून त्यांच्या समर्थकांनी स्वागत केले.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

पांडुरंग माने हे उत्तर महाराष्ट्रातील विमुक्त जाती-भटक्या समाजाचे नेतृत्व करत असून सामाजिक प्रश्नांवर सातत्याने सक्रिय राहिले आहेत. जामखेड नगरपरिषदेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी त्यांनी पाच दिवस आमरण उपोषण केले होते. तसेच जामखेड आगारासाठी नवीन एसटी बसची मागणी करत त्यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर जामखेड आगाराला पाच नवीन बस उपलब्ध झाल्या होत्या.

याशिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार प्रशासनामार्फत सुरू करण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदने देऊन सातत्याने पाठपुरावा केला होता. विविध सामाजिक आणि लोकहिताच्या प्रश्नांवरही त्यांनी आंदोलने व जनजागृती उपक्रम राबवले आहेत.

यापूर्वी पांडुरंग माने यांनी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव म्हणून काम केले होते. त्यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी आमदार रोहित पवार यांना पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला होता. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे.

पक्षप्रवेशानंतर बोलताना पांडुरंग माने म्हणाले, “भक्ती आणि शक्तीच्या अधिष्ठानाने प्रेरित होऊन जनसेवेचा वसा अधिक सक्षमपणे पुढे नेण्यासाठी मी हा नवा प्रवास सुरू केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांच्या हितासाठी अधिक जोमाने काम करणार आहे.”

यावेळी शिवसेना युवा नेते आकाश बाफना, तालुका उपप्रमुख नितीन कोल्हे, ज्येष्ठ नेते कैलास जाधव यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि समर्थक उपस्थित होते.

Previous Post

स्वराज माध्यमिक विद्यालय, ब्राह्मणगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

Next Post

संध्याताई सोनवणे यांच्या संकल्पनेतून तालुकाभर ‘दादांची प्रतिमा’ अभियान; शाळा व शासकीय कार्यालयांना प्रतिमांचे वितरण..

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
58
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
82
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

संध्याताई सोनवणे यांच्या संकल्पनेतून तालुकाभर ‘दादांची प्रतिमा’ अभियान; शाळा व शासकीय कार्यालयांना प्रतिमांचे वितरण..

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In