• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रत्नापूर टोल नाक्यावर मानवत-पाथरीतील स्थानिक वाहनांना टोलमाफी द्या; अन्यथा तीव्र आंदोलनाचा मनसेचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 21, 2026
in Blog
0
रत्नापूर टोल नाक्यावर मानवत-पाथरीतील स्थानिक वाहनांना टोलमाफी द्या; अन्यथा तीव्र आंदोलनाचा मनसेचा इशारा
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

परभणी | प्रतिनिधी :

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ वरील रत्नापूर येथील टोल नाका सुरू झाल्यापासून मानवत व पाथरी तालुक्यातील स्थानिक नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केला आहे. या संदर्भात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी टोल नाका व्यवस्थापकांना निवेदन देत स्थानिक वाहनांना टोलमाफी देण्याची मागणी केली आहे.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

मनसेने दिलेल्या निवेदनानुसार, मानवत व पाथरी ही दोन्ही शहरे अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर असल्याने व्यापारी, विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी आणि नोकरदार वर्गाची दोन्ही शहरांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात ये-जा असते. दैनंदिन कामकाजासाठी वारंवार टोल भरावा लागत असल्याने स्थानिक नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.

शासनाच्या नियमानुसार टोल नाक्यापासून २० किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांच्या खासगी वाहनांना टोलमाफी अथवा मोफत पासची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र, रत्नापूर टोल नाक्यावर हा नियम प्रभावीपणे राबविला जात नसल्याचा आरोप मनसेने केला आहे.

मनसेने मानवत व पाथरी शहरातील स्थानिक खासगी वाहनधारकांना तात्काळ टोलमाफी किंवा मोफत पास देण्याची मागणी केली असून, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. तसेच आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी टोल प्रशासनाची राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या निवेदनावर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव काकडे, शहराध्यक्ष संतोष कुऱ्हाडे, तालुकाध्यक्ष माऊली दहे, बालाजी पौळ, गोविंद घांडगे, दत्तराव शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

संध्याताई सोनवणे यांच्या संकल्पनेतून तालुकाभर ‘दादांची प्रतिमा’ अभियान; शाळा व शासकीय कार्यालयांना प्रतिमांचे वितरण..

Next Post

पेठशिवणी मंडळाच्या सोयाबीन पीक विम्याला हिरवा कंदील; विभागीय आयुक्तांचा शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
58
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
81
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

पेठशिवणी मंडळाच्या सोयाबीन पीक विम्याला हिरवा कंदील; विभागीय आयुक्तांचा शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In