• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पेठशिवणी मंडळाच्या सोयाबीन पीक विम्याला हिरवा कंदील; विभागीय आयुक्तांचा शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 21, 2026
in Blog
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

पालम | प्रतिनिधी

पालम तालुक्यातील पेठशिवणी मंडळातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय विभागीय आयुक्त कार्यालयाने दिला असून, प्रलंबित असलेल्या खरीप २०२५-२६ च्या सोयाबीन पीक विम्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत विमा कंपनीला पात्र शेतकऱ्यांना विमा रक्कम अदा करण्याचे आदेश दिले.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

गतवर्षी अतिवृष्टीमुळे पालम तालुक्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तालुक्यातील पाच महसूल मंडळांपैकी चार मंडळांतील शेतकऱ्यांना सुमारे २२ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला होता. मात्र, पेठशिवणी मंडळाचा सोयाबीन पीक विमा प्रलंबित ठेवण्यात आला होता. याविरोधात शेतकऱ्यांनी पीक विमा चळवळीच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला.

या प्रकरणी १३ मे २०२६ रोजी मंत्रालयात बैठक, तर २२ मे २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी खरीप हंगाम २०२५-२६ मधील अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेऊन उपग्रहाद्वारे (Satellite) प्राप्त तांत्रिक उत्पादनापेक्षा पीक कापणी प्रयोगातून मिळालेल्या प्रत्यक्ष उत्पादनालाच विमा परिगणनेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य विमा रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

मात्र, या निर्णयाविरोधात विमा कंपनीने विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे आक्षेप दाखल केला. त्यावर २१ जुलै २०२६ रोजी झालेल्या अंतिम सुनावणीत विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला आणि विमा कंपनीला पात्र शेतकऱ्यांना विमा रक्कम वितरित करण्याचे आदेश दिले.

या निर्णयामुळे पेठशिवणी मंडळातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, विमा रक्कम वाटपाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे.

सुनावणीसाठी पीक विमा चळवळीतील बंटी लांडगे, बालाजी आज्या बरडे, बालाजी अण्णा बरडे, हेमचंद्र शिंदे, रूपेश शिनगारे, भास्करराव कराळे, ओमकार ठाकूर, सरपंच शिवाजी वाडीवाले, रमेश शिनगारे, मोतीराम शिंदे आदी उपस्थित होते. तसेच कृषी विभाग, परभणी येथील दौलत चव्हाण, थिट्टे मॅडम तसेच विमा कंपनीचे प्रतिनिधीही सुनावणीस उपस्थित होते.

Previous Post

रत्नापूर टोल नाक्यावर मानवत-पाथरीतील स्थानिक वाहनांना टोलमाफी द्या; अन्यथा तीव्र आंदोलनाचा मनसेचा इशारा

Next Post

आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या पाठपुराव्याला यश; संत जनाबाई विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
58
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
81
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या पाठपुराव्याला यश; संत जनाबाई विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In