
कन्नड | प्रतिनिधी
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ कन्नड शहरात विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या वतीने बंद पाळण्यात आला. बंदला व्यापारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचा प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कारवाईची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात अरविंद कांबळे (पूर्व जिल्हाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा), देविदास राठोड (जिल्हा संघटक, वंचित बहुजन आघाडी), सुनिल सिरसाठ (तालुकाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी), रईस मुनीर सौदागर (माजी तालुका महासचिव), संदीप सातदिवे (तालुकाध्यक्ष, आरपीआय आठवले गट), रमेश धनेधर (तालुकाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा), साहेबराव चौतमल (जिल्हा उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी), ईश्वर गायकवाड (तालुका संघटक), धर्मा मोरे (तालुका महासचिव), धम्मपाल पैठणे (तालुका उपाध्यक्ष), रवी गरूड (BLO-1, कन्नड), भास्करराव जाधव, बाबासाहेब शिरसाठ (अध्यक्ष, रिपब्लिकन सेना), लता अवचार (तालुका महिला अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा), कल्पना मनवर, मंगलताई कांबळे (सचिव), पद्मा गजबे, बबिता जाधव, राजेंद्र पगारे (जिल्हा संघटक), सतीश धनेश्वर, राहुल डोंगरे, राकेश पवार, राहुल सातदिवे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान शहरात शांततेचे वातावरण राखण्यात आले असून, संबंधित घटनेबाबत निष्पक्ष चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
