• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कसई दोडामार्ग येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन’ उभारणीसाठी हालचाली;

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 6, 2026
in महाराष्ट्र
0
कसई दोडामार्ग येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन’ उभारणीसाठी हालचाली;
0
SHARES
53
VIEWS
Ad 1

शासकीय जमिनीची मागणी
दोडामार्ग/प्रतिनिधी
दोडामार्ग तालुक्यातील कसई येथील शासकीय जमीन ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन’ उभारणीसाठी सामाजिक व सांस्कृतिक हेतूने हस्तांतरित करण्यात यावी, अशी मागणी ‘समाज जागृती मंच दोडामार्ग’ या संस्थेने तहसीलदार मा राहुल गुरव साहेबांकडे केली आहे. या संदर्भातील एक मागणीपत्र संस्थेच्या वतीने दोडामार्ग तहसील कार्यालयाला सादर करण्यात आले आहे.संस्थेने दिलेल्या पत्रानुसार, दोडामार्ग तालुक्यात ५७ गावे असून येथे मोठ्या प्रमाणावर दलित, वंचित, बौद्ध समाज बांधव तसेच सर्वधर्मीय नागरिक वास्तव्यास आहेत. तालुक्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी साजरी करण्यासाठी समाजाच्या हक्काच्या एका सामाजिक भवनाची (डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन) अत्यंत आवश्यकता आहे.

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

सध्या तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी कोणतीही हक्काची जागा किंवा सभागृह उपलब्ध नाही.या भवनाच्या उभारणीसाठी कसई दोडामार्ग येथील गट क्र. / सर्व्हे क्र. ४३/१ मधील ‘गुरांची गोठण’ ही १४ गुंठे शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी अर्जदारांनी केली आहे. ही जमीन उपलब्ध झाल्यास शासनाच्या विविध योजनांतर्गत किंवा लोकवर्गणीतून या भवनाचे बांधकाम करणे शक्य होणार असल्याचे मंचने म्हटले आहे.वनविभागाचे अभिप्राय पत्र आणि आवश्यक कागदपत्रे जोडलीया मागणीसोबत चालू वर्षाचा ७/१२ आणि ८ अ चे प्रलंबित पत्रक, संस्था नोंदणी प्रमाणपत्र तसेच सदर जमीन वनविज्ञेखाली (Forest Zone) येत नसल्याबाबत वनविभाग सावंतवाडी यांचे अभिप्राय पत्र देखील जोडण्यात आले आहे. तहसीलदार साहेबांनी या प्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून सदर जागेची पाहणी व चौकशी करावी आणि प्रस्तावित शासकीय जमीन ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन’ बांधकामासाठी लवकरात लवकर हस्तांतरित किंवा अलॉट (Allocated) करून द्यावी, अशी नम्र विनंती संस्थेने केली आहे.

या पत्रावर समाज जागृती मंचचे अध्यक्ष श्री. दिपक बुधाजी जाधव, सचिव श्री. संतोष सगुण कदम, खजिनदार श्री. महेश मोहन जाधव यांच्यासह उपाध्यक्ष गोविंद केशव कदम, सहसचिव शंकर शांताराम जाधव आणि सदस्य भगवान महादेव जाधव, मंगेश प्रकाश जाधव, उषाकिरण क्रांतीराज सम्राट, जेनिफर मार्शल लोबो, कैतान आंतोन डिसोझा, रुपेश अर्जुन शिरवलकर आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष गुणाजी गवस,सीताराम जाधव, लक्ष्मण आयनोडकर,क्रांतिराज सम्राट, रामा कासकर,कृष्णा गोविंद जाधव, कृष्णा कदम संदीप कदम उपस्थित होते.

Tags: Dipak Jadhav
Previous Post

मातंग समाजाच्या दफनभूमीवर अतिक्रमाचा आरोप; न्याय न मिळाल्यास १० ऑगस्टपासून सटाणा तहसीलवर आमरण उपोषण

Next Post

तडवळे जि. प. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी स्वाती आवारे; तर उपाध्यक्षपदी अमृता मस्के यांची बिनविरोध निवड!

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
तडवळे जि. प. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी स्वाती आवारे; तर उपाध्यक्षपदी अमृता मस्के यांची बिनविरोध निवड!

तडवळे जि. प. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी स्वाती आवारे; तर उपाध्यक्षपदी अमृता मस्के यांची बिनविरोध निवड!

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In