पंढरपूर तालुका प्रतिनिधी :-
प्रा. साईनाथ कुंभार
राष्ट्रीय समाज पक्षाची युवा संवाद बैठक पंढरपूर येथे पार पडली या कार्यक्रमाला राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष काशीनाथ नाना शेवते मुख्य महासचिव माऊली नाना सलगर युवा प्रदेश अध्यक्ष अजित दादा पाटील पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल दादा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली सदर मीटिंग मध्ये आजचा युवक आणि त्यांच्यापुढील आव्हाने यावरती चर्चा करण्यात आली सदर मीटिंग मध्ये पदाधिकारी निवडी करण्यात आल्या यांमध्ये जिल्हा संपर्क प्रमुख पदी ॲड महाळाप्पा खांडेकर सर यांची निवड करण्यात आली तसेच तालुका अध्यक्ष पदी अरुण चौगुले जिल्हा सचिव पदी अनिल हेगडकर युवक तालुका अध्यक्ष पदी प्रा उज्जन गावडे यांच्या निवडी करण्यात आल्या तसेच जिल्ह्यातील युवकाच्या निवडी करण्यात आल्या.










