• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नीरा-भीमा आणि जेऊर बोगद्यांची बंद पडलेली कामे तातडीने सुरू करा; मराठवाड्याचे हक्काचे पाणी लवकर द्या

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
नीरा-भीमा आणि जेऊर बोगद्यांची बंद पडलेली कामे तातडीने सुरू करा; मराठवाड्याचे हक्काचे पाणी लवकर द्या
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

आमदार कैलास पाटील यांची सरकारकडे आग्रही मागणी; अपूर्ण कामे सुरू न केल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशारा

कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी; दोन्ही बोगद्यांचे काम बंद, मिरगव्हाण पंपगृहाचे कामही संथ गतीने

RelatedPosts

वाशी तालुक्याला मिळणार अग्निशमन दलाचे सुरक्षा कवच

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांची मालिका

मेहकर परिसरातील समृद्धी महामार्गावर भीषण साखळी अपघात

प्रतिनिधी : धाराशिव | दि. १३ नोव्हेंबर २०२६

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील नीरा-भीमा जोड बोगदा, जेऊर बोगदा आणि मिरगव्हाण पंपगृह या महत्त्वपूर्ण कामांची आमदार कैलास पाटील यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख मकरंद राजे निंबाळकर उपस्थित होते. धाराशिव आणि बीड जिल्ह्यांना हक्काचे पाणी मिळवून देणाऱ्या या प्रकल्पातील दोन्ही बोगद्यांची कामे बंद असल्याचे, तर मिरगव्हाण पंपगृहाचे कामही संथ गतीने सुरू असल्याचे पाहणीत समोर आले. त्यामुळे ही कामे रखडलेली असताना मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळणार कसे, असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी उपस्थित केला.

कृष्णा खोऱ्यातील हक्काचे ७ टीएमसी पाणी मराठवाड्यातील दुष्काळी भागाला मिळवून देणारा हा प्रकल्प धाराशिव आणि बीड जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, प्रकल्पातील महत्त्वाचे टप्पे अपूर्ण असल्याने पाणी उपलब्ध होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे बंद पडलेली कामे तातडीने सुरू करून प्रकल्पाला गती द्यावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी सरकारकडे केली आहे.

प्रकल्पातून ७ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणण्याचे नियोजन

नीरा नदीवरील उद्धट बंधाऱ्यातून ७ टीएमसी पाणी २३.६८ किलोमीटर लांबीच्या नीरा-भीमा बोगद्याद्वारे उजनी जलाशयात आणले जाणार आहे. त्यापैकी ५.३२ टीएमसी पाणी करमाळा तालुक्यातील दहिगाव येथून २६.८५ किलोमीटर लांबीच्या जेऊर बोगद्याद्वारे मिरगव्हाण पंपगृहापर्यंत नेण्याचे नियोजन आहे.

तेथून ३.०८ टीएमसी पाणी उपसा करून सीना-कोळेगाव जलाशयात पोहोचवले जाणार आहे, तर २.२४ टीएमसी पाणी बंद नलिका गुरुत्व वाहिनीद्वारे सीना नदीत सोडले जाणार आहे. मात्र, या संपूर्ण पाणीवहन व्यवस्थेतील महत्त्वाचे टप्पे अद्याप पूर्ण झालेले नाहीत.

नीरा-भीमा बोगद्याचे काम जून २०२३ पासून बंद

२३.६८ किलोमीटर लांबीच्या नीरा-भीमा बोगद्यापैकी २०.९९ किलोमीटर काम पूर्ण झाले आहे. चार ठिकाणी मिळून २.६९ किलोमीटर काम अद्याप बाकी असून, हे प्रमाण सुमारे ११.४ टक्के आहे.

  • उद्धट बंधाऱ्याच्या बाजूला सुरुवातीचे सुमारे १.०८ किलोमीटर ओपनकट आणि त्यापुढील ८०० मीटर बोगद्याचे काम बाकी आहे.
  • उजनीच्या बाजूला भादलवाडीजवळ ४४८ मीटर बोगदा आणि शेवटचे ३६० मीटर ओपनकटचे काम अपूर्ण आहे.

आर्थिक नियोजनाअभावी जून २०२३ पासून या बोगद्याचे काम बंद असल्याची माहिती पाहणीदरम्यान समोर आली. आता काम सुरू केले तरी ते पूर्ण होण्यासाठी किमान एक ते दोन वर्षे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जेऊर बोगद्याचे कामही जुलै २०२४ पासून ठप्प

२६.८५ किलोमीटर लांबीच्या जेऊर बोगद्यापैकी २३.९७ किलोमीटर खोदकाम पूर्ण झाले आहे. सात ठिकाणी मिळून २.८८ किलोमीटर खोदकाम बाकी असून, हे प्रमाण सुमारे १०.७२ टक्के आहे.

या बोगद्याच्या अपूर्ण कामांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :

  • दहिगाव येथे उजनीतून पाणी घेण्यासाठीची प्रवेश संरचना अद्याप अपूर्ण आहे.
  • दहिगाव ते जेऊरदरम्यान सर्वाधिक सुमारे २.७१ किलोमीटर खोदकाम बाकी आहे.
  • कोंढेज-सरपडोहदरम्यान सुमारे २७ मीटर खोदकाम बाकी आहे.
  • मिरगव्हाणजवळ सीना नदीच्या बाजूला सुमारे १३३ मीटर खोदकाम अपूर्ण आहे.
  • अन्य दोन ठिकाणी मिळून सुमारे ७ मीटर किरकोळ खोदकाम बाकी आहे.

या बोगद्याचे काम २७ जुलै २०२४ पासून बंद असल्याची माहिती देण्यात आली.

मिरगव्हाण पंपगृहाचे ४० टक्के काम अपूर्ण

मिरगव्हाण पंपगृहाच्या कामाची किंमत १११.५८ कोटी रुपये असून, यापैकी केवळ ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ४० टक्के काम बाकी असून ते अत्यंत संथ गतीने सुरू आहे.

या पंपगृहात प्रत्येकी १,९४० अश्वशक्ती क्षमतेचे सात पंप बसविण्यात येणार आहेत. या सात पंपांची एकूण क्षमता १३ हजार ५८० अश्वशक्ती असणार आहे. पंपगृहाचे काम पूर्ण झाल्याशिवाय नियोजित पाणी सीना-कोळेगाव जलाशयात पोहोचविणे शक्य होणार नाही.

कामे तातडीने सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरून संघर्ष!

नीरा-भीमा बोगदा पूर्ण झाल्याशिवाय हक्काचे ७ टीएमसी पाणी उजनी जलाशयात येणार नाही. जेऊर बोगदा पूर्ण झाल्याशिवाय हे पाणी मिरगव्हाणपर्यंत पोहोचणार नाही आणि पंपगृह पूर्ण झाल्याशिवाय ते सीना-कोळेगाव जलाशयात आणता येणार नाही. अशा प्रकारे एकाच साखळीतील तिन्ही महत्त्वाचे टप्पे रखडल्याने धाराशिव आणि बीड जिल्ह्यांतील दुष्काळी भागाला हक्काचे पाणी मिळण्यास विलंब होत आहे.

त्यामुळे नीरा-भीमा आणि जेऊर बोगद्यांची बंद पडलेली कामे तातडीने सुरू करावीत, मिरगव्हाण पंपगृहाच्या कामाला गती द्यावी आणि मराठवाड्याचे हक्काचे पाणी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे, अशी आग्रही मागणी आमदार कैलास पाटील यांनी सरकारकडे केली. अपूर्ण कामे तातडीने सुरू न झाल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

या पाहणीवेळी मकरंद राजे निंबाळकर, शिवाजी दादा सरडे, जिल्हा परिषद सदस्य सातपुते सर, प्रवीण कोकाटे, रवी वाघमारे, पंकज पाटील, सौदागर जगताप, राणा बनसोडे, राहुल पाटील, शौकत शेख, सुनील गरड, दयानंद थोरात, राकेश सूर्यवंशी, अमोल मुळे, मनोज पडवळ, अर्जुन पाटील, अभिराज कदम, राज जाधव, अशोक साळुंके, कार्यकारी अभियंता नाईक, घनवट आदी उपस्थित होते.

Ad 1
Tags: Vikas Wagh
Previous Post

वाशी तालुक्याला मिळणार अग्निशमन दलाचे सुरक्षा कवच

Related Posts

वाशी तालुक्याला मिळणार अग्निशमन दलाचे सुरक्षा कवच
ताज्या घडामोडी

वाशी तालुक्याला मिळणार अग्निशमन दलाचे सुरक्षा कवच

November 13, 2026
1
समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांची मालिका
ताज्या घडामोडी

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांची मालिका

November 13, 2026
49
मेहकर परिसरातील समृद्धी महामार्गावर भीषण साखळी अपघात
ताज्या घडामोडी

मेहकर परिसरातील समृद्धी महामार्गावर भीषण साखळी अपघात

November 13, 2026
22
बदलापुरातील पाणीगळतीच्या तक्रारीची वरिष्ठ स्तरावर गंभीर दखल
ताज्या घडामोडी

बदलापुरातील पाणीगळतीच्या तक्रारीची वरिष्ठ स्तरावर गंभीर दखल

November 13, 2026
6
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विचारांचा कायम जागर करेल : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील
ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विचारांचा कायम जागर करेल : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

November 13, 2026
7
महाराष्ट्राची राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेत बाजी
ताज्या घडामोडी

महाराष्ट्राची राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेत बाजी

November 13, 2026
4

ताज्या बातम्या

नीरा-भीमा आणि जेऊर बोगद्यांची बंद पडलेली कामे तातडीने सुरू करा; मराठवाड्याचे हक्काचे पाणी लवकर द्या

नीरा-भीमा आणि जेऊर बोगद्यांची बंद पडलेली कामे तातडीने सुरू करा; मराठवाड्याचे हक्काचे पाणी लवकर द्या

November 13, 2026
वाशी तालुक्याला मिळणार अग्निशमन दलाचे सुरक्षा कवच

वाशी तालुक्याला मिळणार अग्निशमन दलाचे सुरक्षा कवच

November 13, 2026
कुसूर येथील नुकसानग्रस्त शेतकरी दौलत गायकवाड यांची संभाजी पवार यांनी घेतली भेट

कुसूर येथील नुकसानग्रस्त शेतकरी दौलत गायकवाड यांची संभाजी पवार यांनी घेतली भेट

November 13, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In