गुन्हे दाखल करा बंदी असलेल्या नायलॉन मांजाची खरेदी-विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे
पालकांना इशारा चायनीज मांजामुळे नागरिक, पक्षी आणि वाहनधारकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होत असल्याने, जर लहान मुलांनी असा मांजा वापरला तर त्यांच्या पालकांवरही कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात यावा
महाराष्ट्र राज्यत शासनाने चायनीज मांजा बंदी असतानी दरवर्षी मांजा प्रोडॉक्शन विक्री कोठून उपलब्ध होत आहे?
संपूर्ण महाराष्ट्रातून चायनीज मांजाची वेली वाट लावण्यासाठी जेथे चाय निर्माण आहे प्रोडक्शन आहे एका वेळेस दाढी टाकून संपूर्ण चायनीज मांजाची विले वाट लावा व कायदेशीर कडक कारवाई करा.
चायनिज मांजा फलटण मध्ये दरवर्षी कोणाच्या आशीर्वादाने विक्री उपलब्ध होत आहे?
चायनीज मांजा विक्रेत्यांना कायद्याची भीती राहिली नाही का?
महाराष्ट्रात चायनीज मांजा बनवणाऱ्या वर व विक्रीस उपलब्ध करून देणाऱ्या मर्डर वाहक मर्डर चे गुन्हे दाखल करावे
संपूर्ण फलटणकर जनतेकडून मागणी आहे.
पोलीस प्रशासन अजून किती वेळ वाट बघणार तोपर्यंत एखाद्या मनुष्याचा चायनीज मांजामुळे बळी जाऊ नये एखाद्या कुटुंबप्रमुखाचा प्राण दगावू नये
🔴परत आठवण करून देत आहे की काही वर्षांपूर्वी फलटण लोणंद रोडवर दोन चाकी वाहनावर लहान मुल आई-वडील प्रवास करत असताना त्या लहान मुलाचे प्राण गमावले आहे हे फलटण मधली सर्वात मोठी घटना आहे तीन ते पाच वर्षाचे अंदाजित मुलाचे वय होते
पैशाच्या लोभ्यासाठी चायनीज माजा विक्री करू नका एखाद्या कुटुंबप्रमुखाचा बळी घेऊ नका
नागरिकांना आवाहन शहरात किंवा परिसरात कुठेही चायनीज मांजाची विक्री होत असल्यास त्वरित जवळच्या फलटण शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन आहे
मुलांकडे चायनीज मांजा असेल तर त्याची विले वाट लावा पालकांना जाहीर आव्हान आहे🙏🏻
चायनीज मांजा (नायलॉन मांजा) विक्री आणि वापरावर पोलिसांनी कडक त्वरित कारवाई सुरू करावी🙏🏻




