• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेला पूल अवघ्या तीन वर्षांत खचला, गडचिरोलीत भ्रष्टाचाराचा कळस!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 6, 2026
in महाराष्ट्र
0
मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेला पूल अवघ्या तीन वर्षांत खचला, गडचिरोलीत भ्रष्टाचाराचा कळस!
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेला पूल अवघ्या तीन वर्षांत खचला, गडचिरोलीत भ्रष्टाचाराचा कळस!
राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन झालेला कोठी–कोरणार पूल अवघ्या तीन वर्षांतच पुरामुळे खचल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेला पूल अवघ्या तीन वर्षांत खचला, गडचिरोलीत भ्रष्टाचाराचा कळस!
गडचिरोली : राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन झालेला कोठी–कोरणार पूल अवघ्या तीन वर्षांतच पुरामुळे खचल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून उभारलेला पूल इतक्या कमी कालावधीत निकामी झाल्याने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे.

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

गुणवत्तानियंत्रण, कंत्राटी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
१५ ऑगस्ट २०२३ रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. विकासाचे प्रतीक म्हणून सादर करण्यात आलेला हा पूल अवघ्या तीन वर्षांतच खचल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणवत्तानियंत्रण, तांत्रिक देखरेख आणि कंत्राटी व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दक्षिण गडचिरोलीत हजारो कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले अनेक रस्ते आणि पूल अल्पावधीतच उखडणे, रस्त्यांना खड्डे किंवा तडे जाण्याच्या घटना वारंवार घडत असताना ही दुर्घटना म्हणजे त्या आरोपांवर शिक्कामोर्तब मानली जात आहे.
‘…म्हणून अधिकारी भ्रष्टाचार करण्यासाठी मोकाट’
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अमोल मारकवार आणि आझाद समाज पक्षाचे अध्यक्ष राज बनसोड यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन पाठवून या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, तत्कालीन कार्यकारी अभियंता बळवंत रामटेके आणि जबाबदार अधिकारी व कंत्राटदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. पालकमंत्र्याचे जिल्ह्यात लक्ष नसल्यामुळे अधिकारी भ्रष्टाचार करण्यासाठी मोकाट सुटल्याचा आरोपही ब्राह्मणवाडे यांनी केला आहे.

प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
याहून धक्कादायक बाब म्हणजे, पूल खचून चार ते पाच दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अधिकृत तांत्रिक अहवाल, चौकशी किंवा जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. उलट संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेला पूल कोसळल्याने विभागाकडून कमालीची गुप्तता पाळली जात असल्याचा आरोपही केला जात आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे वाहून आलेल्या झाडांमुळे पूल खचल्याचा दावा केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः गडचिरोलीचे पालकमंत्री असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचारावर लगाम बसत नसल्याची भावना आता व्यक्त होऊ लागली आहे.
कठोर कारवाई करणार
अल्पावधीतच पूल खचल्याची घटना गंभीर आहे. संबंधित प्रकरणाची तत्काळ तांत्रिक चौकशी करण्याचे आदेश अधीक्षक अभियंत्यांना दिले आहे. चौकशी अहवालामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले.

Tags: Rajesh Magaunwar
Previous Post

शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय कलावंत मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात संपन्न!

Next Post

मांंजरे प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका मंजूर; परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
मांंजरे प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका मंजूर; परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा

मांंजरे प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका मंजूर; परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In