• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वीर येथे १५ किशोरवयीन मुलींना HPV लसीकरण

Pratik Tidke by Pratik Tidke
August 13, 2026
in महाराष्ट्र
0
वीर येथे १५ किशोरवयीन मुलींना HPV लसीकरण
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आरोग्य विभागाचा उपक्रम; स्वच्छता, पौष्टिक आहार व पावसाळ्यातील आजारांबाबत मार्गदर्शन

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

वीर, दि. १३ ऑगस्ट २०२६ : प्राथमिक आरोग्य केंद्र वहाळ अंतर्गत उपकेंद्र वीर यांच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल, वीर येथे किशोरवयीन मुलींसाठी आरोग्यविषयक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ९ ते १४ वयोगटातील १५ मुलींना त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत HPV लसीकरण करण्यात आले.

HPV संसर्गापासून भविष्यात संरक्षण मिळावे, तसेच किशोरवयीन मुलींच्या आरोग्याबाबत योग्य वेळी जनजागृती व्हावी, या उद्देशाने हे लसीकरण करण्यात आले. लसीकरणाच्या वेळी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पालकांना लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडे मॅडम यांनी किशोरवयीन मुलींशी संवाद साधत वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता, पौष्टिक व संतुलित आहार तसेच आरोग्याची योग्य काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. किशोरवय हा शारीरिक व मानसिक विकासाचा महत्त्वाचा टप्पा असून या काळात योग्य आहार, स्वच्छता आणि आरोग्यविषयक सवयी अंगीकारणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच आरोग्य निरीक्षक कोळेकर सर यांनी पावसाळ्यात घ्यावयाच्या आरोग्यविषयक काळजीबाबत विद्यार्थिनींना माहिती दिली. पावसाळ्यात दूषित पाणी, अस्वच्छ परिसर, डासांची वाढ यामुळे होणारे विविध आजार टाळण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी उकळून किंवा शुद्ध करून पिणे, घराच्या व परिसराच्या आसपास पाणी साचू न देणे आदी उपाययोजनांची माहिती देण्यात आली. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या कीटकजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले.

या आरोग्य उपक्रमास पंचायत समिती सदस्य मा. श्री. संजय जावळे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडे मॅडम, आरोग्य निरीक्षक कोळेकर सर, LHV सावंत मॅडम, CHO पायाळ सर, ANM पाटील सिस्टर, MPW जाधव, आशा सेविका पानवलकर तसेच मदतनीस जाधव उपस्थित होते.

न्यू इंग्लिश स्कूल वीर येथील मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकांनी या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले. पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आरोग्य विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

किशोरवयीन मुलींच्या आरोग्याचे संरक्षण, योग्य आरोग्यविषयक सवयी आणि आजारांपासून प्रतिबंधात्मक उपाय याबाबत जनजागृती करण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

Tags: sagar panidar
Previous Post

जामनेर–बोदवड मार्गावर भीषण अपघात; एरंडोल–शेगाव बसच्या धडकेत १९ वर्षीय युवकाचा मृत्यू

Next Post

शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एस. पी. स्कूल व वेदांता अकॅडमी चे 8 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एस. पी. स्कूल व वेदांता अकॅडमी चे 8 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत

शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एस. पी. स्कूल व वेदांता अकॅडमी चे 8 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In