तालुका प्रतिनिधी –
प्रा. साईनाथ कुंभार
एप्रिल 2026 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नांदोरे (ता -पंढरपूर )येथील पायल फाउंडेशन संचलित एस. पी. स्कूल व वेदांता अकॅडमीच्या 8 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले. इ. 4थी मधून स्वरा पारेकर, श्रद्धा चव्हाण, कल्याणी पाटील व इ. 7वी मधून सृष्टी बनसोडे, अक्षरा व्यवहारे, अरोही उलभगत, तन्वी बाबर, असावरी गायकवाड या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे मार्गदर्शक डॉ. नंदकुमार होनराव, संस्थापक अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, दशरथ मोरे, अश्वराज वाघ, बाळासाहेब चव्हाण, विक्रम भिंगारे, वासंती वलगे, स्वाती चव्हाण, कुणाल निंबाळकर यांनी केले. यशस्वी विद्यार्थ्यांना स्वाती चव्हाण, साईनाथ कुंभार, माऊली मोकळे, मयुरी डोके, करुणा हजारे, विद्या पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.









