• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सार्वजनिक मालमत्तेच्या प्रलंबित प्रश्नांवरून रिळे ग्रामस्थ आक्रमक; १५ ऑगस्टला निषेध आंदोलनाचा इशारा

Pratik Tidke by Pratik Tidke
August 13, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
22
VIEWS
Ad 1


शिराळा प्रतिनिधी:
रिळे (ता. शिराळा) येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सार्वजनिक जागेबाबत आणि मालमत्तांवरील प्रलंबित तक्रारींवर तातडीने निर्णय न झाल्यास येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी शांततापूर्ण मार्गाने निषेध आंदोलन करण्याचा इशारा रिळे ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. यासंदर्भातील निवेदन गटविकास अधिकारी (पंचायत समिती, शिराळा), तहसीलदार, पोलीस निरीक्षक व इतर संबंधित अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …


सादर केलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी नमूद केले आहे की, ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक जागेबाबत अनेक तक्रारी, चौकशी व पत्रव्यवहार होऊनही अद्याप प्रशासनाकडून कोणताही अंतिम कारणासहित आदेश जारी करण्यात आलेला नाही. अनधिकृत नोंदी रद्द करणे, चौकशी अहवालाची अंमलबजावणी करणे आणि सार्वजनिक जागा मूळ उद्देशासाठी उपलब्ध करून देणे यात सातत्याने विलंब होत आहे. ग्रामसभेत प्रत्यक्ष चर्चा होऊनही इतिवृत्तात नोंदी न घेतल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला असून, यासंदर्भातील व्हिडिओ पुरावे उपलब्ध असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
राष्ट्रीय ध्वजाचा पूर्ण सन्मान राखून आंदोलन
स्वातंत्र्यदिनाचे गांभीर्य आणि राष्ट्रीय ध्वजाचा सर्वोच्च सन्मान राखूनच हे आंदोलन केले जाईल, असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. अधिकृत ध्वजारोहण कार्यक्रमात कोणताही अडथळा आणला जाणार नसून, ध्वजारोहणानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर संविधानाच्या चौकटीत राहून शांततापूर्ण मार्गाने निषेध नोंदवला जाईल. तसेच, गावातील सामाजिक सलोखा आणि स्वातंत्र्यदिनाचे औचित्य राखून यंदाचे ध्वजारोहण गावातील माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिकांचे वारस, आदर्श शिक्षक किंवा प्रगतशील शेतकरी यांसारख्या सर्वमान्य प्रतिष्ठित व्यक्तीच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.


ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या:

  • सार्वजनिक मालमत्तेबाबत तातडीने कारणासहित अंतिम आदेश काढण्यात यावा.
  • अनधिकृत नोंदी रद्द करून जागा पूर्ववत ग्रामपंचायतीच्या नावावर करण्यात यावी.
  • सक्षम प्राधिकरणामार्फत जागेची अधिकृत मोजणी व हद्द निश्चिती करण्यात यावी.
  • सार्वजनिक शौचालय व इतर आवश्यक नागरी सुविधा मूळ उद्देशानुसार विकसित कराव्यात.
  • चौकशी अहवालाची अंमलबजावणी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्याचा अहवाल ग्रामस्थांना मिळावा.
    प्रशासनाने तातडीने या बाबींची दखल न घेतल्यास भविष्यात अधिक व्यापक व लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्याचा इशारा समस्त रिळे ग्रामस्थांनी दिला आहे.

Previous Post

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

Next Post

“मतांच्या बदल्यात आश्वासने; पण वीर–देवपाट रस्ता आजही खड्ड्यांतच!”

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post

“मतांच्या बदल्यात आश्वासने; पण वीर–देवपाट रस्ता आजही खड्ड्यांतच!”

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In