• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कर्तव्याचा ‘बीट’ अन् वन्यजीवांची ‘सुरक्षा’

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

११ कर्मचाऱ्यांनी लीलया पेलली रेस्क्यूची आव्हानात्मक जबाबदारी!

RelatedPosts

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

५ वर्षांत ७० वन्यजीवांना मिळाले ‘नवजीवन’!

तालुका प्रतिनिधी
पांढरकवडा : मानवी वस्तीत वाट चुकलेले, शिकार्यांच्या जाळ्यात अडकलेले किंवा उघड्या विहिरीत पडून मृत्यूच्या दारात पोहोचलेले वन्यजीव… अशा संकटात सापडलेल्या प्राण्यांसाठी पांढरकवडा वन विभागाची ‘रेस्क्यू टीम’ खऱ्या अर्थाने ‘देवदूत’ ठरत आहे. २०२० मध्ये स्थापन झालेल्या या विशेष पथकाने आपल्या तत्परतेच्या जोरावर अवघ्या पाच वर्षांत तब्बल ७० वन्यजीवांना सुरक्षित जीवनदान देण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

पांढरकवडा वन क्षेत्राच्या विविध भागांत अनेकदा वन्यजीव अपघातामध्ये जखमी होतात, तर काही वेळा शिकारीच्या सापळ्यात अडकतात. अशा वेळी ही रेस्क्यू टीम धावून जाते. पथकाने आतापर्यंत वाघ, बिबट्या, अस्वल, कोल्हा, मोर, नीलगाय, चितळ, माकड, ससा, रानडुक्कर, मांजर, रानकुत्रा, सायाळ आणि महाकाय अजगर यांसारख्या लहान-मोठ्या प्राण्यांना सुरक्षितरीत्या रेस्क्यू केले आहे. वैद्यकीय उपचार करून या प्राण्यांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.

वनक्षेत्र कार्यालयातील नियंत्रण कक्षाला रेस्क्यू संदर्भात कोणताही कॉल प्राप्त होताच, ही टीम अत्यंत कमी वेळेत घटनास्थळी पोहोचते. उपवनसंरक्षक यशवंत बहाळे यांच्या कार्यकाळात या पथकाला अधिक बळ आणि आधुनिक गती मिळाली आहे. पथकातील सदस्यांची कौशल्ये अद्ययावत राहण्यासाठी उपवनसंरक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नियमित वर्कशॉप व प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाते.

या पथकाच्या धडक आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे पांढरकवडा परिसरात मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यात मोठे यश आले असून, या पथकाचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.

बॉक्स
‘दुहेरी जबाबदारी’ लीलया पेलली!
या रेस्क्यू टीमचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची रचना. पथकात १ वनपाल आणि १० वनरक्षक असे एकूण ११ कर्मचारी आहेत. हे सर्व सदस्य आपापल्या कार्यक्षेत्रातील बीट नियमित गस्त आणि संरक्षण कार्य सांभाळून रेस्क्यूची ही अतिरिक्त व आव्हानात्मक जबाबदारी पार पाडतात. वन विभागाने या कामासाठी एक स्वतंत्र चालक आणि सुसज्ज ‘स्पेशल रेस्क्यू व्हॅन’ उपलब्ध करून दिली आहे.

Previous Post

मारेगाव, वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने, त्रस्त ग्राहकांनी दिले निवेदन………..

Next Post

माहूरगड ते धनोडा जीवघेणा रस्ता बनला आहे

Related Posts

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात
Blog

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026
8
Blog

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026
7
Blog

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
24
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!
Blog

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
19
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती
Blog

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026
4
आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले
Blog

आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले

September 28, 2026
1
Next Post
माहूरगड ते धनोडा जीवघेणा रस्ता बनला आहे

माहूरगड ते धनोडा जीवघेणा रस्ता बनला आहे

ताज्या बातम्या

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In